Jump to content

"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६: ओळ १६:


==पुस्तके==
==पुस्तके==
* शुष्क नद्यांचे आक्रोश [[(डॉ. रा.श्री. मोरवंचीकर)]]
* भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती [[(डॉ. रा.श्री. मोरवंचीकर)]]
* उदक चालवावे युक्ती
* उदक चालवावे युक्ती
* नद्या आणि जनजीवन ([[संजय संगवई]])
* पाणी : उद्याची दिशा (मुकुंद धाराशिवकर)
* पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी (अप्पासाहेब पवार)
* भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे  ( [[माधव चितळे]] )
* भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे  ( [[माधव चितळे]] )
* भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती [[(डॉ. रा.श्री. मोरवंचीकर)]]

* शुष्क नद्यांचे आक्रोश [[(डॉ. रा.श्री. मोरवंचीकर)]]


[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]

१७:४८, १ जुलै २०१९ ची आवृत्ती

पाण्याचा थेंब
नळाचे पाणी
बाटलीतील मिनरल वॉटर

पाणी (H2O) हे हायड्रोजनऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा(ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्यांचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले कि त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते,म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवा व त्याचा योग्य वापर करा. पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. मासे पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. पाण्याचे तापमान कमी केले असता, ४°सेल्सियस तापमानापर्यंत ते आकुंचन पावते. परंतु त्यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते (त्याची घनता कमी होते) आणि त्याबरोबरच घनरुपही घेऊ लागते. परिणामी ४°सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असलेल्या पाण्यावर तरंगू लागते. बर्फाळ प्रदेशातील जलचर बर्फाखालील पाण्यात जगत असतात. याला पाण्याची अपवादात्मक प्रसरणशीलता म्हणतात.अणु बाँब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी हि माणसाची मुलभूत गरज आहे .

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५% आहे. अंटार्कटिक हिमखंड, ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी ६१% भाग आहे परंतु नियमित वापरासाठी हे मिळवणे शक्य नाही. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा.

मानवाला पृथ्वीवर उपलब्ध पाणी पुढील स्रोतांमधून मिळते. १) विहीर २) कूपनलिका ३) तलाव ४) नदी ५) ओढे ६) जर ७) पाऊस

भारतातील राज्यवार पाण्याची २०२९ सालची स्थिती

राजस्थान : राजस्थान राज्याच्या शहरी भागात तलाव आणि विहिरी यांची संख्या सुमारे ७७२ आहे; यांपैकी २०१९ साली ३२९ तलाव आणि विहिरी सुकून गेल्या आहेत. राजस्थानमध्ये ११ मोठ्या नद्या आहेत. त्यांतल्या बहुतेक फक्त पावसाळ्यात वाहत्या असतात. या नद्यांचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीला वापरले जाते.

उत्तर प्रदेश : या राज्यात १,७७,००० विहिरी होत्या. गेल्या पाच वर्षांत ७७,००० विहिरी बंद झाल्या. तलाव २५,३५४ होते; पाच वर्षांत १०४५ तलाव कमी झाले, बाकी बहुतेकांत पाणी आहे. . २४ नैसर्गिक तळी आहेत; पैकी १२२ कोरडी झाली आहेत.

बिहार : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार साडेचार लाख हातपंपांत पाणी येत नाही. ८,३८६ पैकी १,८७६ ग्राम पंचायतीमध्ये भूजल खूप खाली गेले आहे. सरकारी आकड्यांनुसार २० वर्षांपूर्वी सरकारी आणि खासगी तलावांची संख्या अडीच लाख होती, ती आता कमी होऊन ९८,४०१ राहिली आहे. राज्यात लहानंोठ्या १५० नद्या आहेत, पैकी ४८ कोरड्या झाल्या आहेत.

पुस्तके

पाणी हे आपले जीवन आहे. पृथ्वीची निर्मितीच मुळात पाण्यापासून झाली आहे असे बोलले जात. आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकार रेडिओ , दूरदर्शन मार्फत पाण्याच्या काटकसरी बाबत जनजागृती करत असले तरी लोक ऐकून बघून सोडून देतात किवा फार थोडे लोक असतात जे पाण्याची बचत करताना दिसतात. आपण पुढच्या पिढीचा विचार करायला पहिजे त्यांचासाठी आपण आत्ता पाण्याची बचत केली तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जातील.