"ए.पी. धांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रा. डाॅ. अश्विनीकुमार पंजाबराव धांडे (जन्म : अमरावती, १७ जुलै १९७... |
(काही फरक नाही)
|
१३:२१, २९ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
प्रा. डाॅ. अश्विनीकुमार पंजाबराव धांडे (जन्म : अमरावती, १७ जुलै १९७०) हे वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिणारे लेखक आहेत. त्यांचे बहुतांशी शिक्षण हे अमरावतीतच झाले. इलेक्ट्राॅनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयांत त्यांनी १९९१ साली बी.ई. आणि १९९९ साली एम.ई. केले. २००७ साली ते पीएच.डी. झाले. सन १९९१पासून काही वर्षे औद्योगिक व्यवस्थापनात चार वर्षे काम केल्यावर ते शिक्षणक्षेत्रात आले.. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काँप्यूटर टेक्नाॅलाॅजीमध्ये त्यांनी २००८ ते या काळात प्राध्यापकी केली आणि नंतर ते पदव्युत्तर विभागाचे प्रमुख झाले. एकविसाहून अधिक वर्षे ते शिक्षणक्षेत्रात आहेत.
खगोलशास्त्र हा प्रा. ए.पी धांडे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावरचे शोधनिबंध त्यांनी विद्यार्थ्यांकडून लिहवून घेतले आहेत. त्यांच्या पुस्तकांतून विश्वनिर्मिती, ब्रह्मांड आणि ईश्वर यांसंबंधीचे त्यांचे विचार वाचायला मिळतात.
प्रा. डाॅ. ए.पी धांडे यांनी लिहिलेली पुस्तके
- Ternary Digital System : Concepts and Applications (सहलेखक - व्ही.टी. इंगोले व व्ही.आर. घिये)
- पुरातन तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान - बदलत्या युगाचा प्रवास
- ब्रह्मांड आणि ईश्वर
- माझ्या गावातील आठवणी
ए.पी. धांडे यांचे काही महत्त्वाचे शोधनिबंध
- An Overview on Properties, Parameter Consideration and Design of Meandering Antenna (सहलेखक - व्ही. अंभोरे) (२०१२)
- Internet voting (e-Voting) in Indian enviorenment (सहलेखक - एस.एन. खांडेकर) (२०११)
- Investigation of A Special Feature of Plasma Column: Nested Plasma Antenna (सहलेखक - एस. भोंडे, व्ही.आर. घिये) (२०१४)
(अपूर्ण)