Jump to content

"अविनाश कोल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. अविनाश कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत. ते २०१७ सालच्या एप्रिल...
(काही फरक नाही)

१५:३३, २९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

प्रा. अविनाश कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत. ते २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात मुंबईतील डी. जी. रूपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. भारताचे पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांच्या चरित्राखेरीज आणखीही काही पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. ‘चीनमधील मुस्लीम समाजातील अलगतेची भावना’ या विषयावर त्यांचे संशोेधन आहे.

अविनाश कोल्हे यांची पुस्तके

  • अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग : प्रशासक ते पंतप्रधान ... एक वाटचाल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ??)
  • अल्बर्ट आईनस्टाईन : निवडक लेखन (अनुवादित, मूळ इंग्रजी, संपादक - जिम ग्रीन)
  • गोपाळ गणेश आगरकर (चरित्र)
  • चौकट वाटोळी (कादंबरी)
  • भारताची फाळणी (इतिहास, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - अनिता इंदरसिंह)
  • रंगदेवतेचे आंग्लरूप : मुंबईतील अ-मराठी रंगभूमी (हिंदी-इंग्रजी नाटकांचा परीक्षणसंग्रह)
  • सेकंड इनिंग (दोन दीर्घकथा)