Jump to content

"वा.ना. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वामन नारायण देशपांडे हे मराठीतील एक नामवंत लेखक व कवी होते. विदर्...
(काही फरक नाही)

१९:११, १८ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

वामन नारायण देशपांडे हे मराठीतील एक नामवंत लेखक व कवी होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते आद्य संपादक होते. देशपांडे मुळचे यवतमाळचे होते. दीनानाथ मंगेशकर आणि देशपांडे हे मित्र होते.

'विलोपले मधु मीलनात या' हे वा.ना. देशपांडे यांचे प्रसिद्ध गीत. हे दीनानाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले असून आशा भोसले यांनी गायले आहे. हे ब्रह्मकुमारी नाटकासाठी लिहिले होते. या नाटकात वा.ना. देशपांडे यांची एकूण १८ पदे होती. 'सुफलिता येथे विधिलेखा, अवतरत खास गमते, उषा विलोला, धरिला रूपा, वीणानाद काव्य आज हो मूर्त गमते' हे वा.ना. देशपांडे यांचेच दुसरे प्रसिद्ध गीत

वा.ना. देशपांडे यांची पुस्तके

  • अनामिका (कवितासंग्रह)
  • आद्य मराठी कवयित्री (संशोधन)
  • आराधना (कवितासंग्रह)
  • उत्तरायण (कवितासंग्रह)
  • कोरकू (कवितासंग्रह)
  • पिकासोचे कबूतर (कवितासंग्रह)
  • रामशास्त्री (साहित्यसमीक्षा)
  • लघुरामायण (ललित)
  • कै. वा.ना. देशपांडे यांचे स्फुट-लेखन, ३ खंड : तुलाधर, चित्रगुप्त, त्रिविक्रम (संपादक प्रा. राम शेवाळकर)
  • विचारसमीक्षा
  • विमर्शिनी (साहित्यसमीक्षा)
  • शारदीय शरसंधान (हे पुस्तक श्रीमत् द्रोणाचार्य या टोपणनावाने लिहिले आहे)
  • स्मृतिस्थळ