"मनोहर चिमोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो प्रस्तुत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल शंका आहे.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता}}
पंडित मनोहर वासुदेव चिमोटे (जन्म : नागपूर, २७ मार्च १९२९; मृत्यू : विरार-मुंबई, ९ सप्टेंबर २०१२) हे एक विख्यात हार्मोनियमवादक होते. भारतामध्ये एकल पेटीवादनाची सुरुवात त्यांनी केली.

पंडित मनोहर वासुदेव चिमोटे (जन्म : नागपूर, २७ मार्च १९२९; मृत्यू : विरार-मुंबई, ९ सप्टेंबर २०१२) हे एक विख्यात हार्मोनियमवादक होते. भारतामध्ये एकल पेटीवादनाची सुरुवात त्यांनी केली. व्हायोलीन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते.
पंडित चिमोटे हे मुंबईतील गॊरेगावमध्ये 'संवादिनी संगीतालय' नावाची संस्था चालवीत

मनोहर चिमोटे यांचा जन्म एका खाणमालकाच्या घरात झाला. घरात सुखसोयींंची आणि ऐषारामाची इतकी रेलचेल होती की चिमोटे यांचे बालपण राजेशाही वातावरणात गेले. त्यांची हवेली राजवाडावजा होती, आणि इकडेतिकडे हिंडण्यासाठी घरची बग्गी होती. असे असले तरी वडील थोड्याफार धार्मिक मनोवृत्तीचे असल्याने घरात भजने आणि कीर्तने होत. भजन-कीर्तनाला भाविक तर येतच पण संगीतकारही येत. मनोहर चिमोटे यांनी श्रीमंती वातावरणात खुशालचेंडूसारखे जगण्यापेक्षा संगीताचे ज्ञान मिळवण्याकडे लक्ष दिले. चिमोटे रात्रंदिवस हार्नोनियमवर रियाज करण्यात घालवू लागले.

नागपूरला आलेल्या पंडित भीष्मदेव वेदींच्या पेटीवादनाने चिमोटे यांना गुरु भेटल्याचे जाणवले. पुढील ४-५ महिने मनोहर चिमोटे यांनी वेदीकडून पेटीचे अनेक बारकावे शिकून घेतले. हे ज्ञान त्याना हार्मोनियमचे एकल वादन करण्यासाठी उपयोगी पडले.

सन १९५०मध्ये भीष्मदेव पंडित मुंबईत सुरसिंगार उत्सवाची व्यवस्था पाहण्यासाठी गेले असे समजल्यावर मनोहर चिमोटे मुंबईला गेले. तेथे वेदींनी त्यांना कुंवरश्याम घराण्याचे शास्त्रीय संगीत गायक लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे पाठवले. तेथे राहून मनोहर चिमोटे यांना संगीताचे आणि गायकाला हार्मोनियमची संगत कशी करावी यांचे सखोल ज्ञान झाले. त्यानंतर चिमोट्यांना गायकांना पेटीची साथ करण्याची निमंत्रणे येऊ लागली आणि पुढचे सर्व आयुष्य त्यांनी हार्मोनियमसाठी खर्च केले.

चिमोटे हे उत्तम गायकही होते. त्यांनी अनेक रागांत ख्याल, ठुमरी आणि भजने गाण्यासाठी चिजा बांधल्या. त्यांच्याजवळ ख्यातनाम गायकांच्या चिजांचा फार मोठा संग्रह होता.

पंडित चिमोटे हे मुंबईतील गोरेगावमध्ये 'संवादिनी संगीतालय' नावाची संस्था चालवीत. तेठथे ये कंठसंगीत आणि पेटीवादन दोन्ही शिकवत. ६० वर्षांच्या संगीतसेवेनंतर चिमोटे सान २०१२ साली निधन पावले.

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* महाराष्ट्र गौरव पुरसकार (१९९८)
* महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९८)
* महाराष्ट्र सरकारचा सूरमणी पुरस्कार
* आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार
* बेळगावचे पंडित विठ्ठलराव कोरगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा संवादिनी साधक पुरस्कार (एप्रिल २००६)
* संवादिनी प्रतिष्ठानचा गौरव पुरस्कार (२००९)
* National Centre for the Performing Arts (NCPA)च्या संगीतपीठाचा श्रेष्ठ संगीतकार पुरस्कार (२००५)
* राजर्षी शाहू संगीत रजनी (कोल्हापूर)चा संगीत पुरस्कार (२००२)
* हृदयेश आर्ट्‌स आणि डाॅ. प्रभा अत्रे प्रतिष्ठानाचा सुरेशबाबू माने यांच्या जन्म शताब्दीनिमित्त स्मृति पुरस्कार (३१ मे २००३)
* नागपूरच्या दक्षिण-मध्य कल्चर झोनचा पुरस्कार (१९९२)

[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]
(अपूर्ण)

१९:३९, १३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

पंडित मनोहर वासुदेव चिमोटे (जन्म : नागपूर, २७ मार्च १९२९; मृत्यू : विरार-मुंबई, ९ सप्टेंबर २०१२) हे एक विख्यात हार्मोनियमवादक होते. भारतामध्ये एकल पेटीवादनाची सुरुवात त्यांनी केली. व्हायोलीन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते.

मनोहर चिमोटे यांचा जन्म एका खाणमालकाच्या घरात झाला. घरात सुखसोयींंची आणि ऐषारामाची इतकी रेलचेल होती की चिमोटे यांचे बालपण राजेशाही वातावरणात गेले. त्यांची हवेली राजवाडावजा होती, आणि इकडेतिकडे हिंडण्यासाठी घरची बग्गी होती. असे असले तरी वडील थोड्याफार धार्मिक मनोवृत्तीचे असल्याने घरात भजने आणि कीर्तने होत. भजन-कीर्तनाला भाविक तर येतच पण संगीतकारही येत. मनोहर चिमोटे यांनी श्रीमंती वातावरणात खुशालचेंडूसारखे जगण्यापेक्षा संगीताचे ज्ञान मिळवण्याकडे लक्ष दिले. चिमोटे रात्रंदिवस हार्नोनियमवर रियाज करण्यात घालवू लागले.

नागपूरला आलेल्या पंडित भीष्मदेव वेदींच्या पेटीवादनाने चिमोटे यांना गुरु भेटल्याचे जाणवले. पुढील ४-५ महिने मनोहर चिमोटे यांनी वेदीकडून पेटीचे अनेक बारकावे शिकून घेतले. हे ज्ञान त्याना हार्मोनियमचे एकल वादन करण्यासाठी उपयोगी पडले.

सन १९५०मध्ये भीष्मदेव पंडित मुंबईत सुरसिंगार उत्सवाची व्यवस्था पाहण्यासाठी गेले असे समजल्यावर मनोहर चिमोटे मुंबईला गेले. तेथे वेदींनी त्यांना कुंवरश्याम घराण्याचे शास्त्रीय संगीत गायक लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे पाठवले. तेथे राहून मनोहर चिमोटे यांना संगीताचे आणि गायकाला हार्मोनियमची संगत कशी करावी यांचे सखोल ज्ञान झाले. त्यानंतर चिमोट्यांना गायकांना पेटीची साथ करण्याची निमंत्रणे येऊ लागली आणि पुढचे सर्व आयुष्य त्यांनी हार्मोनियमसाठी खर्च केले.

चिमोटे हे उत्तम गायकही होते. त्यांनी अनेक रागांत ख्याल, ठुमरी आणि भजने गाण्यासाठी चिजा बांधल्या. त्यांच्याजवळ ख्यातनाम गायकांच्या चिजांचा फार मोठा संग्रह होता.

पंडित चिमोटे हे मुंबईतील गोरेगावमध्ये 'संवादिनी संगीतालय' नावाची संस्था चालवीत. तेठथे ये कंठसंगीत आणि पेटीवादन दोन्ही शिकवत. ६० वर्षांच्या संगीतसेवेनंतर चिमोटे सान २०१२ साली निधन पावले.

पुरस्कार

  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९८)
  • महाराष्ट्र सरकारचा सूरमणी पुरस्कार
  • आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार
  • बेळगावचे पंडित विठ्ठलराव कोरगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा संवादिनी साधक पुरस्कार (एप्रिल २००६)
  • संवादिनी प्रतिष्ठानचा गौरव पुरस्कार (२००९)
  • National Centre for the Performing Arts (NCPA)च्या संगीतपीठाचा श्रेष्ठ संगीतकार पुरस्कार (२००५)
  • राजर्षी शाहू संगीत रजनी (कोल्हापूर)चा संगीत पुरस्कार (२००२)
  • हृदयेश आर्ट्‌स आणि डाॅ. प्रभा अत्रे प्रतिष्ठानाचा सुरेशबाबू माने यांच्या जन्म शताब्दीनिमित्त स्मृति पुरस्कार (३१ मे २००३)
  • नागपूरच्या दक्षिण-मध्य कल्चर झोनचा पुरस्कार (१९९२)