"मुस्लिम सण आणि उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
रमझान हा शब्द रम्झ म्हणजे जळणे या मूळ शब्दावरून आला. मुस्लिम दिनदर्शीकेत बदल होण्यापूर्वी हा महिना, जाळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात येत असे म्हणून, किवा या उपासाने सर्व पापे जळून जातात अशी श्रद्धा असते म्हणून या महिन्याला रमझान हे नाव पडले असावे. या महिन्यातील एक रात्र अशी मानली जाते की जी प्रेषित महमद यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. या रात्री सर्व प्राणीमात्र व वनस्पती ईश्वराला आदरपूर्वक वाकून वंदन करते असे मानले जाते. |
रमझान हा शब्द रम्झ म्हणजे जळणे या मूळ शब्दावरून आला. मुस्लिम दिनदर्शीकेत बदल होण्यापूर्वी हा महिना, जाळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात येत असे म्हणून, किवा या उपासाने सर्व पापे जळून जातात अशी श्रद्धा असते म्हणून या महिन्याला रमझान हे नाव पडले असावे. या महिन्यातील एक रात्र अशी मानली जाते की जी प्रेषित महमद यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. या रात्री सर्व प्राणीमात्र व वनस्पती ईश्वराला आदरपूर्वक वाकून वंदन करते असे मानले जाते. |
||
रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते. रमझान महिन्यानंतर सुमारे ७० दिवसांनी येणाऱ्या दशमीला ईद-उल जुहा किंवा बकरीद म्हणतात. |
|||
'''(५) शब्बे कदर (लैलत उल कदर)''' - शब म्हणजे रात्र व कदर म्हणजे न्यायदान, शब्बे कदर म्हणजे न्यायदानाची रात्र. रमझान महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसातली ही एक रात्र असते. बहुदा ही सत्ताविसावी रात्र असते असे मानले जाते, परंतु त्याबद्दल निश्चिती नसल्याने शेवटच्या दहा दिवसातील विषम दिनाच्या रात्रीपैकी ती कोणतीही एक रात्र असू शकते. (एकविसावी, तेविसावी, पंचविसावी, सत्ताविसावी, किवा एकोणतिसावी) ही रात्र नेमकी कोणती हे प्रेषित महमद यांच्याशिवाय कोणालाच माहीत नसते असे मानले जाते. रमझान महिन्याच्या या रात्रीपर्यंतच्या वर्षात मानवाने जी कृत्ये केलेली असतात, त्याबाबतचे न्यायदान या रात्री ईश्वर करतो व त्यासाठी पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठवितो असे मानले जाते. |
'''(५) शब्बे कदर (लैलत उल कदर)''' - शब म्हणजे रात्र व कदर म्हणजे न्यायदान, शब्बे कदर म्हणजे न्यायदानाची रात्र. रमझान महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसातली ही एक रात्र असते. बहुदा ही सत्ताविसावी रात्र असते असे मानले जाते, परंतु त्याबद्दल निश्चिती नसल्याने शेवटच्या दहा दिवसातील विषम दिनाच्या रात्रीपैकी ती कोणतीही एक रात्र असू शकते. (एकविसावी, तेविसावी, पंचविसावी, सत्ताविसावी, किवा एकोणतिसावी) ही रात्र नेमकी कोणती हे प्रेषित महमद यांच्याशिवाय कोणालाच माहीत नसते असे मानले जाते. रमझान महिन्याच्या या रात्रीपर्यंतच्या वर्षात मानवाने जी कृत्ये केलेली असतात, त्याबाबतचे न्यायदान या रात्री ईश्वर करतो व त्यासाठी पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठवितो असे मानले जाते. |
११:०१, ३१ मे २०१८ ची आवृत्ती
इस्लाम धर्मातील काही महत्त्वाचे सण पुढीलप्रमाणे आहेत -
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
(१) बारह वफात - (ईद ए मिलाद) - प्रेषित मोहमद हे इस्लामी दिनदर्शिकेप्रमाणे रवि उल अव्वल या तिसऱ्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, बारा दिवसांच्या आजारानंतर मरण पावले, म्हणून या दिवसाला बारह वफात असे म्हणतात. (बारह = बारा, वफात = मृत्यू). या कारणाने या रवि उल अव्वल महिन्याला बारह वफात असे दुसरे नावदेखील दिले गेले आहे. प्रेषित महमद यांचा जन्मदिनसुद्धा हाच आहे, त्यामुळे हा दिवस प्रेषितांच्या जयंतीचा व त्यांच्या पुण्यतिथीचाही दिवस आहे. प्रेषित महमद यांच्या मृत्यूच्या दिवशी कुराण वाचतात. सुन्नी मुस्लिमांच्या दृष्टीने हा विलाप करण्याचा दिवस असतो. हा दिवस प्रेषितांचा जन्मदिवसही असल्याने सर्व इस्लामी देशात आनंद साजरा केला जातो. या दिवशी प्रेषितांच्या जीवनाचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, सभा भरविल्या जातात.
(२) शब्बे मेराज - इस्लामी वर्षाचा सातवा महिना "रज्जब" या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसाची रात्र ही शब्बे मेराज म्हणून साजरी केली जाते. मेराज म्हणजे आरोहण करणे. या रात्री प्रेषितांना बुराख नावाच्या पंख असलेल्या घोड्यावर बसवून स्वर्गात अल्लाच्या समक्ष नेण्यात आले असे मानले जाते. ही घटना प्रेषितांच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. एके रात्री मक्का येथील मशिदीत प्रेषित झोपले असताना देवदूत गॅब्रिएल तेथे आला. प्रेषिताना घेऊन येण्याची अल्लाचा (ईश्वराचा) त्याला आदेश होता. प्रथम देवदूताने त्यांना मक्केपासून दूर असलेल्या जेरुसलेम या पवित्र नगरीत नेले. तेथे प्रेषितांनी दुसऱ्या अनेक प्रेषितांबरोबर नमाज अदा केली. तेथे असलेल्या एका प्रचंड दगडावरून बुराख या घोड्यावर स्वार होऊन त्यांना स्वर्गात नेण्यात आले. वाटेत त्यांना अब्राहाम, मोशे, येशू असे अनेक प्रेषित भेटले. तसेच त्यांना नरकाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर त्यांना अल्लाच्या समक्ष हजर करण्यात आले. अल्लाने त्यांना विचारले ," तू मला कोणती भेट आणली आहेस.?" तेव्हा प्रेषित म्हणाले, " मी इबादत (प्रार्थना) आणली आहे." त्यांच्या या उत्तरावर खुश होऊन अल्लाने जाहीर केले की, " हा माझा प्रेषित आहे." व त्यांना वर मागण्यास सागितले. महंमद म्हणाले, " मला स्वतःकरिता काही नको, पण माझे अनुयायी पापी आहेत त्यांना तुझी कृपा मिळू दे." अल्लाने तसे करण्याचे कबूल केले. परंतु अल्ला त्यांना म्हणाला, " मी त्यांच्यावर कृपा करीन पण त्यांनी रोज पन्नास वेळा नमाज पढला पाहिजे व वर्षातून सहा महिने उपवास केले पाहिजेत." तेव्हा प्रेषित म्हणाले , माझे अनुयायी अशक्त आहेत त्यांना इतके नमाज व उपवास जमणार नाहीत." तेव्हा अल्लाने सागितले, " ठीक आहे त्यांनी रोज पाच वेळा नमाज पढावा व वर्षातून एक वेळा उपवास करावा. म्हणजे त्यांना रोज पन्नास वेळा नमाज पढल्याचे व सहा महिने उपवास केल्याचे पुण्य लाभेल." अशा रीतीने अल्लाची कृपा प्राप्त करून प्रेषित बुराख घोड्यावर बसून मक्केला परत आले.
(३) शब्बे बरात(किंवा शब-ए-बारात) - इस्लामी दिनदर्शिकेचा आठवा महिना 'शबान' या महिन्याच्या चवदाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. 'बरात' म्हणजे संरक्षणाची हमी आणि 'शब' म्हणजे रात्र. या रात्री प्रार्थना केल्यास आपल्या भविष्याच्या बाबतीत संरक्षणाची हमी मिळते, अशा कल्पनेने या रात्रीला शब्बे बरात असे म्हणतात. ही रात्र प्रार्थना व जागरण करून घालविली जाते. या रात्री ईश्वर प्रत्येक माणसाच्या पुढील आयुष्यातील घटनांची नोंद करीत असतो अशी समजूत आहे. म्हणून अशा वेळी प्रार्थना केल्यास आपल्या भवितव्यात चागलेच लिहून ठेवले जाईल असे मानले जाते. या सणाच्या रात्री सतत कुराणाचे पठण व जागरण करावे असे सांगितले आहे. काही लोक या दिवशी आपल्या नातेवाइकाच्या कबरीजवळ जाऊन प्रार्थना करतात. व कुराणातील अल फातिहा ही प्रार्थना म्हणतात. या दिवशी मृतात्म्यांना नरकातून मुक्ती मिळते अशी मान्यता असल्याने ही प्रार्थना केली जाते. शिया पंथाचे मुस्लिम हा दिवस इमाम मेहदीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. आणि हसन, हुसेन हे जे हुतात्मे होऊन गेले त्यांचे स्मरण करतात.
(४) रमझान - रमझान (रमझान-उल मुबारक) हा इस्लामी दिनदर्शिकेचा नववा महिना आहे. हा उपवास करण्याचा महिना आहे. प्रत्येक मुस्लिमाने आचरल्याच पाहिजेत अशा ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्यांत रमझान महिन्यातील सर्व दिवस उपवास ही एक आहे. या महिन्यातले पहिले चंद्रदर्शन ज्या संध्याकाळी होईल त्यानंतर उजाडणाऱ्या सकाळपासून या महिन्यातील उपवास सुरू होतो. आणि शेवटचे चंद्रदर्शन झाल्यावर हा उपवास संपतो. या रमझान महिन्यातच स्वर्गातून प्रेषिताद्वारे कुराण पृथ्वीवर उतरले असे मानले जाते. या महिन्यात स्वर्गाची द्वारे उघडली जातात व नरकाची द्वारे बंद होतात अशी मान्यता आहे. या महिन्यात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास पाळला जातो. सायंकाळनंतर उपवास सोडतात. रमझानच्या काळात मशिदीत विशेष सामूहिक प्रार्थना होतात. रोज कुराण पठण केले जाते.
शिया पंथाचे मुस्लीम लोक या महिन्याच्या एकवीस-बाविसाव्या दिवशी अलीच्या कबरीची ताबुताप्रमाणे मिरवणूक काढतात. ते अलीला पहिला धर्मगुरू व प्रेषितांप्रमाणेच मानतात. काही मुस्लिम या महिन्यात काही कालपर्यंत मशिदीच्या एका भागात पडदा लावून एकांतवास करतात. या महिन्याच्या सत्ताविसाव्या रात्री, आपण वर्षभरात केलेल्या सर्व बऱ्या वाईट कर्माबद्दल अल्लाह निकाल देतो, अशा कल्पनेने त्याची करुणा भाकण्यासाठी प्रत्येक मुस्लीम अल्लाची प्रार्थना करतो. या रात्रीला शब्बे कदर म्हणतात. परंतु शब्बे कदरची रात्र ही सत्ताविसावी रात्रच असेल असे नक्की नसल्याने बरेच मुस्लिम शेवटच्या दहा दिवसातील प्रत्येक विषम रात्री प्रार्थना करतात.
रमझान हा शब्द रम्झ म्हणजे जळणे या मूळ शब्दावरून आला. मुस्लिम दिनदर्शीकेत बदल होण्यापूर्वी हा महिना, जाळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात येत असे म्हणून, किवा या उपासाने सर्व पापे जळून जातात अशी श्रद्धा असते म्हणून या महिन्याला रमझान हे नाव पडले असावे. या महिन्यातील एक रात्र अशी मानली जाते की जी प्रेषित महमद यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. या रात्री सर्व प्राणीमात्र व वनस्पती ईश्वराला आदरपूर्वक वाकून वंदन करते असे मानले जाते.
रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते. रमझान महिन्यानंतर सुमारे ७० दिवसांनी येणाऱ्या दशमीला ईद-उल जुहा किंवा बकरीद म्हणतात.
(५) शब्बे कदर (लैलत उल कदर) - शब म्हणजे रात्र व कदर म्हणजे न्यायदान, शब्बे कदर म्हणजे न्यायदानाची रात्र. रमझान महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसातली ही एक रात्र असते. बहुदा ही सत्ताविसावी रात्र असते असे मानले जाते, परंतु त्याबद्दल निश्चिती नसल्याने शेवटच्या दहा दिवसातील विषम दिनाच्या रात्रीपैकी ती कोणतीही एक रात्र असू शकते. (एकविसावी, तेविसावी, पंचविसावी, सत्ताविसावी, किवा एकोणतिसावी) ही रात्र नेमकी कोणती हे प्रेषित महमद यांच्याशिवाय कोणालाच माहीत नसते असे मानले जाते. रमझान महिन्याच्या या रात्रीपर्यंतच्या वर्षात मानवाने जी कृत्ये केलेली असतात, त्याबाबतचे न्यायदान या रात्री ईश्वर करतो व त्यासाठी पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठवितो असे मानले जाते.