"बी.के. गोयल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. बी.के गोयल (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : मुंबई, २० फेब्रुवारी, २०१८) हे...
(काही फरक नाही)

१५:१०, २१ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. बी.के गोयल (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : मुंबई, २० फेब्रुवारी, २०१८) हे एक जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ होते. डॉ. गोयल याचा सेलिब्रिटींपासून ते गोरगरीब रुग्णांपर्यंत सर्वांनाच आधार वाटे. डॉ. गोयल यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यांत कधीही भेदभाव न करता सर्वांवर योग्य ते उपचार केले. आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारे म्हणूनही डॉ. गोयल प्रसिद्ध होते. शेवटपर्यंत ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि मानद अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहिले. डॉ. गोयल यांच्या पार्थिवावर मुंबईतील बाणगंगा स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यासोबतच ते जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून काम करीत. अवघ्या २९व्या वर्षी जे. जे. रुग्णालयातील हृदयरोग विभगाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

भरीव वैद्यकीय सेवा

देशातील पहिले इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि मोबाइल कोरोनरी केअर युनिटी स्थापन करण्याचे श्रेय डॉ. गोयल यांना जाते. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, असोसिएशन ऑफ फिजिशिअन, नॅशनल सोसायटी ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीजेस आणि अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशिअन यांसारख्या नामांकित संस्थामध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. देशातील पल्स पोलिओ अभियान, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडो अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, हार्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॅजी, धन्वंतरी फाऊंडेशन येथेही त्यांनी भरीव काम केले.

पन्नास वर्षांहून अधिक वर्षांच्या वैद्यकीय सेवाकाळात डॉ. गोयल यांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली. ह्य़ुस्टनस्थित टेक्सास हार्ट इन्स्टिटय़ूटमध्येही त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ सल्लागाराचे पद भूषविले. भारतीय सैन्यदलाच्या विभागाचेही ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या वैद्यकीय सल्लागार चमूमध्येही त्यांचा सहभाग होता. मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या पुढाकारातूनच पोलिओची लस निर्मिली गेली असून त्याला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यतादेखील मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही गोयल यांनी वैद्यकीय व शिक्षणक्षेत्रात दिलेले भरीव योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. गोयल यांनी केवळ भारतातील शेकडो रुग्णांना जीवनदान दिले नाही, तर अनेक कुशल डॉक्टरही तयार केले. त्यांचे विद्यार्थी आज जगात अनेक ठिकाणी उत्तम वैद्यकीय सेवा देत राहतील.

डॉ. बी.के. गोयल यांना वेळोवेळी मिळालेले पुरस्कार

  • पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण.