"चंदूकाका जगताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चंदूकाका जगताप (जन्म : इ.स. १९४८. मृत्यू : सासवड. २८ जानेवारी २०१८) हे...
(काही फरक नाही)

२२:३४, ३१ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

चंदूकाका जगताप (जन्म : इ.स. १९४८. मृत्यू : सासवड. २८ जानेवारी २०१८) हे सासवडचे रहिवासी. सासवड नगरपरिषदेचे ते १९८५ ते १९९२ व पुन्हा २००२ ते २००७ या काळात ते नगराध्यक्ष होते. १९८५ सालापासून सतत सात वेळा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक होते. २००४मध्ये सात महिन्यांसाठीते पुणे स्थनिक स्वराज्य मतदार संघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले. तर २००८पासून तीन वर्षांसाठी ते राज्य सहकार परिषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.

चंदुकाका जगताप यांनी अत्यंत कष्टातून आणि गरिबीतून मोठी प्रगती केली होती. सासवडमध्ये त्यांनी संत सोपानकाका बॅंकेची, तर खळद येथे पुरंदर मिल्क या उद्योगाची स्थापना केली. सासवडचे श्री शिवाजी शिक्षण मंडळ आणि पुरंदर नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. वीर धरणातून सासवडसाठी झालेली पाणी योजना त्यांच्याच काळात पुर्ण झाली. त्या बरोबरच सासवड शहराचा कायापालट करण्यात चंदुकाका यांचा मोठा आणि निर्णायक वाटा होता.

कौटुंबिक माहिती

सासवडच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरपरिषदेच्या गटनेत्या आनंदीकाकी जगताप या चंदूकाकांच्या पत्नी होत, तर पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आणि पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे चिरंजीव तर राणी व सोनल या दोन कन्या होत. माजी वनमंत्री पतंगराव कदम हे चंदूकाका जगतापांचे व्याही होत.