"वेताळगड किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वेताळगड हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल...
(काही फरक नाही)

१०:५०, २८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

वेताळगड हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.

सिल्लोड तालुक्यातील अंभई, हळदाघाट, हळदागाव मार्गे गेल्यावर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिषय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा ’जंजाळा दरवाजा’ म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्यात शिरल्यावर पाचच मिनिटात बालेकिल्ला लागतो. येथे बर्‍यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत. त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद, बारादरी आहेत. बारादरीतून हवा खाण्याचा व परिसर न्याहाळण्याचा आनंद घेता येतो,

गडावर सिताफळाची भरपूर झाडे आहेत. येथेच खालच्या बाजूला एक जुनी तोफ आहे.


पहा : महाराष्ट्रातील किल्ले