"रविराज गंधे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: रविराज गंधे हे एक माध्यमतज्ज्ञ आणि सिनेपत्रकार आहेत. ते हे सत्यक... |
(काही फरक नाही)
|
१५:१६, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
रविराज गंधे हे एक माध्यमतज्ज्ञ आणि सिनेपत्रकार आहेत. ते हे सत्यकथेतून कथा लिहिणारे लेखक – पत्रकार म्हणून ओळखले जातात. सत्यकथा’ आणि अन्य मासिकांतून कथालेखन करणारे रविराज गंधे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ’, ‘लोकसत्ता ’मधून माध्यमविषयक लिखाण करतात. त्यांनी रेडिओ, टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रे यांतून विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. ’ग्रंथाक्षर’ ह्या दिवाळी अंकाचे आणि ‘जागर पर्यावरणाचा’ या पर्यावरणतज्ञांच्या मुलाखतींच्या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. पुण्या–मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम’ ह्या विषयांवरील व्याख्याता म्हणून ते कार्यरत आहेत.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उच्च अभिरुचीच्या साहित्य - नाटक -भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा संस्कृतिकारणापासून दुरावल्यासारखा झाला आहे. अशा वेळी प्रेक्षकांना-वाचकांना साहित्यविश्वाची ओळख होणे, त्यांना वाचनाची गोडी लावण्याचे प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे, हे ओळखून रविराज गंधे यांनी मुंबई दूरदर्शनसाठी पुस्तक–परिचय करून देणार्या ‘अमृतवेल’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. सुरूवातीपासूनच स्वतःचे वेगळेपण जपणा-या या कार्यक्रमाला ‘सह्याद्री माणिक सन्मान’ आणि ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रविराज गंधे यांची पुस्तके
- वेध पर्यावरणाचा (संपादित, प्रकाशन दिनांक ४-६-२०१७)