"मोहन लोके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मोहन लोके (जन्म : १९४२; मृत्यू : २०१७) हे एक सिनेछायाचित्रकार आणि अभ...
(काही फरक नाही)

०७:०९, २७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मोहन लोके (जन्म : १९४२; मृत्यू : २०१७) हे एक सिनेछायाचित्रकार आणि अभिनेते होते. सुमरे ५० वर्षे हे काम त्यांनी केले. 'स्टुडिओ एक तूही निरंकार'च्या नावाने त्यांनी सुमारे दीडशेहून अधिक चित्रपटांच्या स्थिरचित्रणाचे काम केले.

स्थिर छायाचित्रणाचा तसा प्रत्यक्ष चित्रपटाशी संबंध नसला तरी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये या छायाचित्रणाची भूमिका महत्त्वाची असते. पुढे दृकश्राव्य माध्यमांच्या काळात त्यांचेही महत्त्व कमी झाले असले तरी जेव्हा मुद्रित माध्यम हे एकमेव प्रसिद्धीचे माध्यम होते तेव्हा स्थिर छायाचित्रणाला खूप महत्त्व होते. अशा काळात मोहन लोके यांनी चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर अनुभवले आणि आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अनेक कलावंतांना ग्लॅमर मिळवून दिले.

कॅमेऱ्याच्या डोळ्यामागे चांगला कलावंत उभा असेल तर समोरच्या साध्या दृश्यालाही वेगळे परिमाण लाभते आणि साध्या व्यक्तिमत्त्वाचेही सौंदर्य खुलून दिसते. मोहन लोके यांनी अनेक दशके ही कामगिरी पार पाडताना जुन्या नव्या काळातील कलावंतांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दादा कोंडके यांच्यासोबत कुणीही कलावंत सलगपणे दीर्घकाळ काम करू शकला नाही. मात्र, मोहन लोके ही एक अशी व्यक्ती होती की, ज्यांनी दादांसोबत बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये काम केले. स्थिर छायाचित्रण करण्यापुरते मर्यादित न ठेवता दादांनी त्यांना अनेक छोट्या-मोठ्या भूमिकाही दिल्या. पांडू हवालदार, येऊ का घरात, आली अंगावर, शूर आम्ही सरदार, बजरंगाची कमाल, सून लाडकी सासरची, जिवलगा, नवरा माझा नवसाचा अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या, त्यांनी केलेल्या भूमिकांचेही वेळोवेळी कौतुक झाले.

गौरव

  • स्टिल फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन २०११ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.