"हनुमान फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
(काही फरक नाही)
|
२३:५०, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
हनुमान फळ हे रामफळ व सीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे.
हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात.
एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड ते दोन किलोपर्यंत असते. एका झडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा मौसम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्हयातील बार्शी आणि इंदापूर भागातून हनुमान फळे पुण्याच्या बाजारात येतात.