Jump to content

"रमेश नेवसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रमेश जि. नेवसे हे सह्याद्रीमध्ये सन १९६५ पासून भ्रमंती करणारे ग...
(काही फरक नाही)

००:०६, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

रमेश जि. नेवसे हे सह्याद्रीमध्ये सन १९६५ पासून भ्रमंती करणारे गड-अभ्यासक आहेत. ते पुण्यातील किर्लोस्कर न्युमॅटिक्समाधून मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या १८ गडकिल्ल्यांवरील १८ पुस्तके एकाच दिवशी आणि एकाच वेळी प्रकाशित झाली आहेत.

यापूर्वी त्यांनी 'विशाल सह्याद्री' नावाच्या वृत्तपत्रात लेखन केले आहे. स्मिता हे मासिक, कटकट हे विनोदी वार्षिक, आणि पोस्ट मॉर्टेम हे साप्ताहिक त्यांनी काही वर्षे चालवले. त्यांच्या सुमारे १२ ललित कादंबऱ्या, आणि ३५७ कथा आणि लेख छापून आले आहेत. त्याणचे शिवाजीचे पहिले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाधीन आहे.

कुलाबा, जंजिरा, तोरणा, पन्हाळा, पुरंदर, प्रतापगड, राजगड, रायगड, वसई, विजयदुर्ग, विशाळगड, शिवनेरी, सज्जनगड, सातारा, सिंधुदुर्ग, सिंहगड, सुवर्णदुर्ग, आणि शनवारवाड्यासह पुणे जिल्ह्यातील अन्य गड अशी गडकिल्ल्यांवरची १८ पुस्तके रमेश नेवसे यांनी लिहिली व प्रकाशित केली आहेत. [[ : ]]