Jump to content

"कांपिल्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कांपिल्य ही महाभारत काळातील दक्षिण पांचाळ या राज्याची राजधानी ह...
(काही फरक नाही)

१७:५५, ८ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

कांपिल्य ही महाभारत काळातील दक्षिण पांचाळ या राज्याची राजधानी होती. हे शहर आधुनिक काळामध्ये फरुखाबाद जिल्ह्यात येते.

त्या काळातील पांचाळ हे राज्य गंगा नदीमुळे उत्तर पांचाळ आणि दक्षिण पांचाळ असे दुभाजित होते. गंगा नदीच्या उत्तर काठावर अहिच्छत्र ही राजधानी असलेले उत्तर पांचाळ असून दक्षिणेला दक्षिण पांचाळ हे राज्य होते.

इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकात पांचाळ हे राज्य भारतातातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

महाभारतात सांगितल्याप्रमाणे शंतनू राजाच्या काळात द्वीमठ हा उत्तर पाचाळचा राजा होता. द्रुपद या द्वीमठचा नातू. द्रोणाचार्यांनी द्रुपदाचा पराभव करून उत्तर पांचाळ ताब्यात घेतले आणि द्रुपदाला दक्षिण पांचाळ दिले. द्रुपदाची मुलगी. मूळ पांचाळची म्हणून हिला पांचाली हे नाव पडले. तिचे स्वयंवर काांपिल्य शहरात झाले.

महाभारताच्या युद्धात दॊन्यी पांचाळ राज्यांनी पांडवांना साथ दिली. युद्धानंतर भीमाने आपली विजय यात्रा पांचाळ प्रदेशातून सुरू केली. त्यावेळी त्याने अंग, अयोध्या, काशी, चेदी आणि मत्स्य या राज्यांवर ताबा मिळवला. पांचाळवर पांडवांच्या वंशजांनंतर नाग राजांनी राज्य केले.

मध्ययुगीन इतिहास काळात पांचाळ राज्य हे रुहेलखंड म्हणून ओळखले जात होते. आधुनिक रुहेलखंडात उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, राामपूर, बरेली, पिलिभीत, आणि शहाजहानपूर ही शहरे येतात.

अहिच्छत्रचे अवशेष आजही बरेली जिल्ह्यातील रामनगर येथे (आंवळा तालुका) आहेत.

संदर्भ

  • महाभारत सभा पर्व