Jump to content

"निर्मला गोगटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: निर्मला गोगटे (माहेरच्या निर्मला बापट, जन्म : १९३६ - ) या एक पुण्यात...
(काही फरक नाही)

२१:२८, ५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

निर्मला गोगटे (माहेरच्या निर्मला बापट, जन्म : १९३६ - ) या एक पुण्यात राहणाऱ्या शास्त्रीय संगीत गायिका व अभिनेत्री आहेत. सी. आर. व्यास, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, व्ही आर. आठवले यांसारख्या दिग्गज गायकांच्याकडे त्या गायन शिकल्या. नाट्यसंगीतासाठी त्यांना कृष्णराव चोणकर, गॊविंदराव पटवर्दन आणि पुरुषोत्तम वालावलकर यांसारखे गुरू लाभले. मराठी आणि संस्कृत रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांच्या नाट्यसंगीत गायनासाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत.

रेडिओ आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांव्यतिरिक्त गोगटे यांनी भारताप्रमाणेच अमेरिकेतही गायनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.

महाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाचे जेव्हा इंदिरा गांधी यांनी मुंबईत १९८१ साली उद्‌घाटन केले, तॆव्हा त्या कार्यक्रमात गाणे सादर करावयाचा मान निर्मला गोगटे यांना मिळाला होता.

निर्मला गोगटे यांनी भूमिका केलेली नाटके

  • एकच प्याला
  • मानापमान
  • संशयकल्लोळ
  • सौभद्र
  • स्वयंवर


निर्मला गोगटे यांची प्रसिद्ध गीते

  • श्रीहरी गोड तुझी बासरी (भावगीत : (राग - भैरवी)

ग्रंथलेखन

  • inter-relation of music on Gujarati, Marathi and Kannada. stage (मराठी)

पुरस्कार


(अपूर्ण)