"मुगल-ए-आझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मुगले आझम हा के.आसिफ याची निर्मिती असलेला ५ ऑगस्ट १९६० रोजी प्रद... |
(काही फरक नाही)
|
१२:००, ३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
मुगले आझम हा के.आसिफ याची निर्मिती असलेला ५ ऑगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. चित्रपट निर्मितीसाठी शापूरजी पालनजी यांनी पैसा पुरवला होता. चित्रपटाची नायिका ही 'अनारकली' नावाची काल्पनिक (अनैतिहासिक) नर्तकी होती. या चित्रपटापूर्वी याच नर्तकीवर 'अनारकली' नावाचा हिंदी चित्रपट निघालेला होता.
शापूरजी पालनजी यांनी पैसा पुरवून मुगल-ए-आजम नावाचे एक हिंदी नाटक रंगमंचावर आणले हॊते. या नाटकाचे दिग्दर्शक फिरोज नावाची व्यक्ती होती. नाटकात शशी कपूर भूमिका करत असत.
मुगले आझम ज्यावेळी मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात पहिल्यांदा प्रदर्शित झाला, त्यावेळी तो पाहण्यासाठी पाकिस्तानातून सिनेरसिक येत. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र तिकीट खिडकी उघडली होती. पासपोर्ट दाखवला की या रसिकांनी तिकीट मिळत असे.