"लेख टंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लेख टंडन (जन्म : लाहोर-पाकिस्तान, १३ फेब्रुवारी १९२९; मृत्यू : पवई-म...
(काही फरक नाही)

१६:३६, १७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

लेख टंडन (जन्म : लाहोर-पाकिस्तान, १३ फेब्रुवारी १९२९; मृत्यू : पवई-मुंबई, १५ आॅक्टोबर २०१७) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक होते.

लेख टंडन यांचे वडील फकीरचंद टंडन हे पृथ्वीराज कपूर यांचे सहाध्यायी होते. त्यामुळे भारतीय चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातील या महत्त्वाच्या कलाकाराकडून चित्रपटक्षेत्रात येण्याची प्रेरणा लेख यांना मिळणे स्वाभाविक होते. मात्र त्यानंतरच्या काळात टंडन यांनी जिवाचे रान करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले.

लेख टंडन हे चित्रपटसृष्टीत अगदी कृष्णधवल चित्रपटाच्या जमान्यापासून होते. दूरचित्रवाणी या नव्याने अवतरलेल्या माध्यमातही टंडन यांनी मुशाफिरी केली, त्यात काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून कलेचा आनंदही मिळवला. त्यांच्यामुळेच शाहरुख खानसारखा अभिनेता आधी दूरचित्रवाणीला आणि नंतर चित्रपटसृष्टीला मिळाला.

लेख टंडन यांचे पहिले प्रेम दिग्दर्शनावर होते. अभिनय हा अनुषंगाने जीवनात आलेला भाग होता. त्यामुळे त्यांनी अभिनयासाठी एकाही निर्मात्याकडून कधीच मानधन घेतले नाही. आपल्या जीवनानंदात मश्गूल राहण्यात टंडन यांना अधिक आनंद होता. त्यामुळे चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत राहूनही सतत चर्चेत राहण्यात त्यांना रस नव्हता.

दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • अगर तुम ना होते
  • आम्रपाली
  • खुदा कसम
  • चेन्नई एक्स्प्रेस
  • झुक गया आसमान
  • दुल्हन वही जो पिया मन भाये
  • प्रिन्स
  • प्रोफेसर
  • रंग दे बसंती
  • स्वदेस

टंडन यांनी दिग्दर्शित केलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • दिल दरिया
  • फिर वही तलाश

पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार