"दत्तू भोकनळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: दत्तू भोकनळ (जन्म : ५ एप्रिल १९९१) हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मरा... |
(काही फरक नाही)
|
२२:०५, ६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
दत्तू भोकनळ (जन्म : ५ एप्रिल १९९१) हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या सर्व चाचण्यांत उत्तीर्ण होऊन तो लष्करात आला.
पुण्यातल्या खडकी येथील बाँबे इंजिनिअरिंग ग्रुप या लष्कराच्या शाखेत काम करताना दत्तू भोकनळला रोइंग या खेळाची पहिली ओळख झाली. कुसरत अली हे त्याचे पहिले गुरू. या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यातीलच आर्मी रोइंग नोडला (एआरएन) रवाना झाला. तेथे त्याला रोइंगचे राष्ट्रीय कोच इस्माईल बेग यांचे मार्गदर्शन मिळाले. तेथे भरपूर सराव करून दत्तूने २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण पदके जिंकली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
दत्तू भोकनळची यशस्वी रोइंग कारकीर्द
- २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके
- २०१६ साली चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग स्पर्धेत दत्तू भोकनळने रौप्य पदक मिळवले.
- दक्षिण कोरियातल्या चुंग जू येथील ‘फिसा एशियन ॲन्डओशॅनिक ऑलिंपिक क्वालिफिकेशन’ या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात रौप्य पदक.
- २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी. भारताकडून रोइंगसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू होता.