"वीरधवल खाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: वीरधवल खाडे (जन्म : कोल्हापूर, २९ ऑगस्ट १९९१) हा ऑलिंपिक स्पर्धांत... |
(काही फरक नाही)
|
१४:०७, ६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
वीरधवल खाडे (जन्म : कोल्हापूर, २९ ऑगस्ट १९९१) हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. जेव्हा तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला तेव्हा तो वयाने सर्वात लहान, १७ वर्षाचा, जलतरणपटू होता.
वीरधवलचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज हे त्याचे महाविद्यालय.
कारकीर्द
वीरधवलला वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी वडिलांकडून पोहण्याची प्रेरणा मिळाली. शाच्या सुट्ट्यांमध्ये त्याने कोल्हापूरमधील जलतरण शिक्षण शिबिरांत सहभाग घेतला. वयाच्या ९व्या वर्षी त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.
सन २००६मधील आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये वीरधवल खाडेने तीन नवीन विक्रम नोंदवीत सहा सुवर्णपदके जिंकली. चीनमधील पेकिंग येथे २००८ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्याने ५०, १०० आणि २०० मीटरच्या फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला. त्यांपैकी त्याने १०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्यासाठी ५०.०७ सेकंदांचा वेळ देऊन त्याने स्वतःचाच विक्रम मोडला.
२०१० सालातील आशियायी स्पर्धेत वीरधवलने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक मिळवले. तब्बल २४ वर्षांनी भारताच्या नावावर या प्रकारचे पदक जमा झाले. या कामगिरीसाठी वीरधवल खाडेला २०१०मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [[वर्ग: इ.स. १९९१ मधील जन्म[[