"सत्यपालसिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. सत्यपालसिंह (जन्म : बसौली, मीरत जिल्हा-उत्तरप्रदेश, २९ नोव्हें... |
(काही फरक नाही)
|
०८:०५, ८ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
डॉ. सत्यपालसिंह (जन्म : बसौली, मीरत जिल्हा-उत्तरप्रदेश, २९ नोव्हेंबर १९५५) हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे खाते मिळाले आहे.
शिक्षण
सत्यपालसिंह हे रसायनशास्त्रातील एम.एस्सी. असून त्यांनी दिल्ली विद्यापीटातून एम.फिल. केले आहे. ऑस्ट्रेलियातून त्यांनी एम.बी.ए. ही पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते लोकप्रशासन या विषयात एम.ए. झाले असून नक्षलवाद या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी त्या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे. ते आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत.
==डॉ. सत्यपालसिंह यांनी आजवर भूषवलेली पोलीस खात्यातील पदे==:
- गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
- नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
- बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
- नागपूर पोलीस क्षेत्राचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस
- मुंबईचे (गुन्हेगारी शाखेचे) पोलीस सहआयुक्त
- महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्राचे विशेष इन्स्पे्क्टर जनरल
- नागपूरचे पोलॆस आयुक्त
- पुण्याचे पोलीस आयुक्त
- महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासन खात्याचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (ADGP)
- मुंबईचे पोलीस आयुक्त
पोलीस खात्यातील कामगिरी
- मुंबईत १९९०च्या आसपास विस्तारलेल्या गुन्हेगारी विश्वाची पाळेमुळे खणून काढली. या गुन्हेगारांत छॊटा राजन, छोटा षकील आणि अरुण गवळी यांसारखे गुंड होते.
- १९९०च्या उत्तरार्धात त्यांनी लूटमार करणार्या, खंडणी वसूलणार्या आणि प्रस्थापितांचे खून करणार्या गुन्हेगारी टोळ्यांचा फडषा पाडला. हे करण्यासाठी त्यांनी खास पोलीस गट तयार करून दया नायक, प्रदीप शर्मा आणि विजय साळसकर यांच्यासारख्या पोलीस अधिकार्यांना चकमकी घडवून गुंडांना ठार मारण्याची मोकळीक दिली.
- २५ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईच्या जव्हेरी बाजाजारात आणि गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बाँबस्फोटांतील गुन्हेगारांचा छडा लावला.
(अपूर्ण)