"म.अ. मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (जन्म : १४ फेब्रुवारी, १९१८) हे संस्कृत भाष... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (जन्म : १४ फेब्रुवारी, १९१८) हे संस्कृत भाषा, महाभारत |
डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (जन्म : १४ फेब्रुवारी, १९१८) हे संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित आहेत. त्यांची अनेक पुस्तके, ग्रंथ, शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. |
||
१९४३ साली डेक्कन कॉलेजमधून |
मेहेंदळे यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि नंतर १९४३ साली डेक्कन कॉलेजमधून पीएच.डी. संपादन केली. काहीच वर्षांत त्यांचा ‘प्राकृत शिलालेखांचे ऐतिहासिक व्याकरण’ हा पीएचडीचा शोधप्रबंध त्याच कॉलेजने प्रसिद्ध केला. हे सारे वयाच्या तिशीतच संपादन केलेले यश त्यांच्यासाठी आजपर्यंत त्याच दर्जाने काम करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडले. |
||
पीएच.डी झाल्यावर त्यांनी कर्नाटक आणि गुजरातमधील महाविद्यालयांत, त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषय शिकवला. जर्मनी आणि अमेरिकेतही अभ्यासाच्या निमित्ताने जाऊन आले. |
|||
⚫ | डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. [[रा. |
||
मेहेंदळे यांनी १९४१साली आंतरजातीय विवाह केला. |
|||
आजही मेहेंदळे हे पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात गेली अनेक दशके कामाचा कोणताही बडिवार न माजवता, संशोधनाचे काम अव्याहतपणे करीत राहिले आहेत. |
|||
⚫ | डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. [[रा.ना. दांडेकर]] यांच्या आग्रहावरून भांडारकर संस्थेत ते रुजू झाले आणि त्यांच्या हातून महाभारतावरील संशोधनाचे एक अफाट आणि अचाट म्हणता येईल, असे काम पूर्ण झाले. कोणताही मोबदला न घेता त्यांनी केलेले हे काम जगातील सगळ्याच पंडितांना आजही सतत त्यांच्या बौद्धिक उंचीची जाणीव करून देत असते. |
||
आजही मेहेंदळे हे पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात गेली अनेक दशके कामाचा कोणताही बडिवार न माजवता, संशोधनाचे काम अव्याहतपणे करीत राहिले आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसाठी महाभारताच्या चिकित्सक संपादित आवृत्तीसाठी केलेले काम आणि महाभारताची सांस्कृतिक सूची यांच्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. डॉ. मेहेंदळे यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध संदर्भासाठी कायमच उपयुक्त आहेत. शब्द आणि त्यांचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ यांवरही त्यांचे निबंध आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे भारताचे ब्रीदवाक्य आणि मुंडकोपनिषदातील ‘सत्यमेव जयते नानृतं’ यांतील संदर्भानुसार बदलणारा अर्थ त्यांनी दाखवून दिला. ‘प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती’ या विषयावरील त्यांच्या व्याख्यानमालेला वाईच्या प्रज्ञापाठशाळेने अक्षररूप दिले व याच शीर्षकाचा ग्रंथही प्रकाशित केला आहे. या ग्रंथामध्ये महाभारतातील कथा, रूपके तसेच वेदांतील वृत्र कथा, वेद आणि अवेस्था अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण, तरीही सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. |
|||
संस्कृत, प्राकृत, महाभारत, अवेस्ता अशा विषयांवर त्यांनी केलेल्या एकूण संशोधनकार्याची माहिती हाच एका ग्रंथाचा ऐवज आहे. ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ आणि ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ एवढे दोन ग्रंथही जगविख्यात होण्यास पुरेसे ठरावेत, असे हे प्रचंड काम डॉ. मेहेंदळे यांनी करून ठेवले आहे. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध करणार्या मेहेंदळे यांना खर्या अर्थाने प्रसिद्धिपराङ्मुख राहण्यातच अधिक आनंद वाटला. |
संस्कृत, प्राकृत, महाभारत, अवेस्ता अशा विषयांवर त्यांनी केलेल्या एकूण संशोधनकार्याची माहिती हाच एका ग्रंथाचा ऐवज आहे. ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ आणि ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ एवढे दोन ग्रंथही जगविख्यात होण्यास पुरेसे ठरावेत, असे हे प्रचंड काम डॉ. मेहेंदळे यांनी करून ठेवले आहे. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध करणार्या मेहेंदळे यांना खर्या अर्थाने प्रसिद्धिपराङ्मुख राहण्यातच अधिक आनंद वाटला. |
||
==डॉ. म.अ.मेहेंदळे यांची ग्रंथसंपदा== |
==डॉ. म.अ.मेहेंदळे यांची ग्रंथसंपदा== |
||
* अशोकाचे भारतातील शिलालेख (मराठी, १९४८) |
|||
* कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत (इंग्रजी) |
* कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत (इंग्रजी) |
||
* डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी) |
* डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी) |
२०:०४, ४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (जन्म : १४ फेब्रुवारी, १९१८) हे संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित आहेत. त्यांची अनेक पुस्तके, ग्रंथ, शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
मेहेंदळे यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि नंतर १९४३ साली डेक्कन कॉलेजमधून पीएच.डी. संपादन केली. काहीच वर्षांत त्यांचा ‘प्राकृत शिलालेखांचे ऐतिहासिक व्याकरण’ हा पीएचडीचा शोधप्रबंध त्याच कॉलेजने प्रसिद्ध केला. हे सारे वयाच्या तिशीतच संपादन केलेले यश त्यांच्यासाठी आजपर्यंत त्याच दर्जाने काम करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडले.
पीएच.डी झाल्यावर त्यांनी कर्नाटक आणि गुजरातमधील महाविद्यालयांत, त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषय शिकवला. जर्मनी आणि अमेरिकेतही अभ्यासाच्या निमित्ताने जाऊन आले.
मेहेंदळे यांनी १९४१साली आंतरजातीय विवाह केला.
डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. रा.ना. दांडेकर यांच्या आग्रहावरून भांडारकर संस्थेत ते रुजू झाले आणि त्यांच्या हातून महाभारतावरील संशोधनाचे एक अफाट आणि अचाट म्हणता येईल, असे काम पूर्ण झाले. कोणताही मोबदला न घेता त्यांनी केलेले हे काम जगातील सगळ्याच पंडितांना आजही सतत त्यांच्या बौद्धिक उंचीची जाणीव करून देत असते.
आजही मेहेंदळे हे पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात गेली अनेक दशके कामाचा कोणताही बडिवार न माजवता, संशोधनाचे काम अव्याहतपणे करीत राहिले आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसाठी महाभारताच्या चिकित्सक संपादित आवृत्तीसाठी केलेले काम आणि महाभारताची सांस्कृतिक सूची यांच्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. डॉ. मेहेंदळे यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध संदर्भासाठी कायमच उपयुक्त आहेत. शब्द आणि त्यांचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ यांवरही त्यांचे निबंध आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे भारताचे ब्रीदवाक्य आणि मुंडकोपनिषदातील ‘सत्यमेव जयते नानृतं’ यांतील संदर्भानुसार बदलणारा अर्थ त्यांनी दाखवून दिला. ‘प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती’ या विषयावरील त्यांच्या व्याख्यानमालेला वाईच्या प्रज्ञापाठशाळेने अक्षररूप दिले व याच शीर्षकाचा ग्रंथही प्रकाशित केला आहे. या ग्रंथामध्ये महाभारतातील कथा, रूपके तसेच वेदांतील वृत्र कथा, वेद आणि अवेस्था अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण, तरीही सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.
संस्कृत, प्राकृत, महाभारत, अवेस्ता अशा विषयांवर त्यांनी केलेल्या एकूण संशोधनकार्याची माहिती हाच एका ग्रंथाचा ऐवज आहे. ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ आणि ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ एवढे दोन ग्रंथही जगविख्यात होण्यास पुरेसे ठरावेत, असे हे प्रचंड काम डॉ. मेहेंदळे यांनी करून ठेवले आहे. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध करणार्या मेहेंदळे यांना खर्या अर्थाने प्रसिद्धिपराङ्मुख राहण्यातच अधिक आनंद वाटला.
डॉ. म.अ.मेहेंदळे यांची ग्रंथसंपदा
- अशोकाचे भारतातील शिलालेख (मराठी, १९४८)
- कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत (इंग्रजी)
- डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी)
- मराठीचा भाषिक अभ्यास (मराठी)
- रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी)
- वरुणविषयक विचार (मराठी)
- वेदा मॅन्युस्क्रिप्ट्स (इंग्रजी)
- प्राचीन भारत – समाज आणि संस्कृती (मराठी)
- हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत (इंग्रजी)
डॉ. म.अ. मेहेंदळे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- दिल्लीच्या साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार
- मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व