"प्रदीप लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रदीप लोखंडे हे महाराष्ट्रासह भारताच्या अन्य राज्यांच्या ग्र... |
(काही फरक नाही)
|
०७:२१, २६ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
प्रदीप लोखंडे हे महाराष्ट्रासह भारताच्या अन्य राज्यांच्या ग्रामीण भागांत ग्रंथालयांचे जाळे निर्माण करणारे एक समाज कार्यकर्ते आहेत. ते मूळचे वाईचे असून कॉमर्सचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे मार्केटिंगचा डिप्लोमा आहे आणि त्यांनी काही वर्षे जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीत काम केले आहे. कामाच्या निमित्ताने ते गुजराथ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांच्या बऱ्याच भागांत फिरले आहेत. फिरतीच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावागावांतून बराच डेटा गोळा केला आहे. उदाहरणार्थ, गावात किती दुकाने आहे, त्यांतून काय विकले जाते, किती घरांत टी.व्ही. आहेत, इंटरनेट किती लोक वापरतात, वगैरे वगैरे. हे सर्वेक्षण करताना प्रदीप लोखंडे यांच्या ध्यानात आले की गावांत अतिरिक्त ज्ञान मिळवण्याची काहीच साधने नाहीत. शाळेत नेमलेली क्रमिक पुस्तके सोडली तर कुठलीच पुस्तके लोकांनी वाचलेली नाहीत. लोखंड्यांनी ठरवले की आपण यासाठी काहीतरी केले पाहिजे.
प्रदीप लोखणडे यांनी माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालये बनवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांनी चालविलेली विशेष ग्रंथालये. सन २००१मध्ये हे काम सुरू झाले. शाळेतला एक विद्यार्थी या ग्रंथालयाची व्यवस्था पहातो. २००९सालापर्यंत या कार्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गुजराथ, छत्तीसगड, तेलंगण, मध्य प्रदेश आदी राज्यांत पॊचला. प्रदीप लोखंडे यांनी ग्रंथालये तर उघडलीच, पण याशिवाय लोकांकडून देणग्या मिळवून २० हजार गावांत २८ हजार संगणक बसवले. गावांना पुरवण्यासाठी आज ते एकतर नवे संगणक विकत घेतात किंवा आयटी कंपन्यांतून जुने कालबाह्य झालेले संगणक मिळवतात.
आज, २०१७ साली ३६ हजार शाळांत प्रदीप लोखंड्यांनी उघडलेल्या लायब्रऱ्या सुरू अाहेत; वाचनसंस्कृती वाढवणारी ही जगातली ही सर्वात मोठी कल्पना समजली जाते.
{अपूर्ण)