Jump to content

"प्रदीप शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस इन्पेक्टर आहेत. ते चकमकफेम म्ह...
(काही फरक नाही)

२१:५८, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस इन्पेक्टर आहेत. ते चकमकफेम म्हणून प्रसिद्ध आहेत.

शर्मा यांचा जवळपास ३१२ चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला आहे, त्यांत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर २००८ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. २०१३ मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.

प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी, २४ ऑगस्ट २०१७ रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले.