Jump to content

"वसंत सखाराम आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वसंत सखाराम आपटे (जन्म : पुणे, ११ जानेवारी, १९३५; मृत्यू : ८ जानेवा...
(काही फरक नाही)

१७:०८, १७ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

वसंत सखाराम आपटे (जन्म : पुणे, ११ जानेवारी, १९३५; मृत्यू : ८ जानेवारी, २०१४) हे स्थापत्यकार आणि मराठी विज्ञान परिषदेचे सक्रिय सदस्य होते. मराठी विज्ञान परिषदेचा त्यांचा संबंध "आपटे बंधू स्मृती व्याख्यानमाले"पासून आला. त्यांचे ग वि आपटे यांनी,  मराठी भाषेतून विज्ञान प्रसार व्हावा या हेतूने सुरू केलेल्या, या कार्याची धुरा ग वि आपटे यांच्या पश्चात वसंत आपटे यांनी आपल्या खांद्यावर घेतली.

वसंत आपटे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण वाडिया कॉलेजमधून झाले.  स्थापत्यशास्त्राचे शिक्षण त्यांनी मुंबईच्या "जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून घेतले. सुरुवातीची काही वर्षे मुंबईमध्ये व्यवसाय करून नंतर १९७० पासून ते पुनश्च पुण्यात वास्तव्यास आले व त्यांनी वास्तुविद्या - आरेखनाचा  व्यवसाय सुरू केला. 


(अपूर्ण)