"पहलाज निहलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहला... |
(काही फरक नाही)
|
२२:०४, ११ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. पहलाज निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली. तसेच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही उडी घेतली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. पहलाज निहलानी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत.
पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या आडमुठ्या आणि वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्यावर नाराज होते. २०१७ सालच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेऊन पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यापूर्वीही अनेक दिग्गज कलाकारांनी निहलानींच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निहलानी यांनी कधीच कलाकारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना जुमानले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अॅक्शन हिरो’ संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता.
११ ऑगस्ट २०१७ रोजी पहलाज निहालानींना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला, त्यांच्या जागी गीतकार आणि अॅडमेकर प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.