"हेमा साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ.हेमा साने (जन्म : १९४०) या पुण्यात राहणाऱ्या एक वनस्पतीशास्त्र... |
(काही फरक नाही)
|
१८:१३, ३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
डॉ.हेमा साने (जन्म : १९४०) या पुण्यात राहणाऱ्या एक वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. त्या वनस्पती शास्त्रातल्या एम.एस्सी. पीएच्.डी. असून भारतविद्या शास्त्रातल्या एम.ए. एम.फिल. आहेत.हेमा साने या पुण्यातील आबासाहेब गरवारे (एम.ई.एस.) कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्या अस्सल निसर्गप्रेमी असून त्यांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा इतिहासाचादेखील गाढा अभ्यास आहे..
पुण्यातील जोगेश्वरी बोळातून पुढे गेल्यावर शीतलादेवीचा पार आहे. तेथील एका जुनाट आणि पडका वाटावा अशा वाड्यात हेमा साने राहतात. वाड्यात त्यांच्याबरोबर चार मांजरांचा आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा पक्षांचाही निवास आहे.
हेमा साने यांनी सन १९६०पासून विजेचा वापरच केला गेलेला नाही. त्यामुळे घरात विजेचा दिवा नाहीच, पण दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणेही नाहीत. नोकरीतील शेवटची दहा वर्ष जबाबदारी असल्याने त्यांनी लुना वापरली.तोपर्यंत त्या पायीच जात होत्या.त्यानंतर देखील नोकरी व्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात. अजूनही त्या विहिरीवरून पाणी आणतात. त्यांनी टेलिफोनही वापरलेला नाही. केवळ दिवसाच्या प्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. मात्र उपलब्ध झाल्यापासून त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरू लागल्या आहेत.
हेमा साने यांनी लिहिलेली पुस्तके
- सम्राट अशोकावरील एक पुस्तक
(अपूर्ण)