Jump to content

"हिंदू देवांची वाहने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदुधर्मात ३३ कोटी देव मानले गेले आहेत. काहींच्या मते ३३ कोटी म...
(काही फरक नाही)

२३:२८, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती

हिंदुधर्मात ३३ कोटी देव मानले गेले आहेत. काहींच्या मते ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकारचे देव. या ३३ कोटी देवांपैकी बहुसंख्य देव इकडून तिकडे हिंडत नसले तरी या देवांना स्वतःची वाहने आहेत. इतर प्राण्याबरोबर गाढव, खेकडा, विंचू, घोरपड, शेळी ही देखील काही देवतांची वाहने आहेत. खालील यादीत यापैकी काही देवांची वाहने दिली आहेत.

  • अग्नी - बकरा
  • इंद्र - ऐरावत (हत्ती), उच्चैश्रवा(घोड्या)ने ओढलेला रथ
  • इक्षुमती - मगर
  • कामदेव - पोपट
  • कामाख्या - साप
  • कार्तिकस्वामी - मोर
  • कुबेर - मनुष्य
  • केतू - गिधाड
  • गंगा - मगर
  • गणपती - उंदीर
  • तारिणी देवी - बदक
  • दुर्गा - वाघ
  • बहुचरा देवी - कोंबडा
  • ब्रह्मदेव - हंस
  • भ्रामरंबा - कीटक
  • भल्लुका - अस्वल (भल्लुक म्हणजे अस्वल!)
  • यम - रेडा
  • योगिनी कारकरी - खेकडा
  • योगिनी गौरी - घोरपड
  • योगिनी जलकामिनी - बेडू
  • रती - कबुतर
  • रुद्रकाली देवी - कावळा
  • लक्ष्मी - घुबड, पांढरा हत्ती
  • वरुण - सुसर
  • वायु - हरीण
  • विष्णू - गरुड
  • शंकर - नंदी (बैल)
  • शनिदेव - कावळा
  • शीतलादेवी - गाढव
  • सरस्वती - हंस किंवा मोर
  • सूर्य - सात घोड्यांचा रथ


देवांनी पाळलेले प्राणी

  • कुबेर - मुंगूस
  • दत्त - गाय आणि चार कुत्री
  • धन्वंतरी - जळू
  • भैरव - कुत्रा