"निवृत्ती महाराज वक्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते (जन्म : बुलढाणा, ३० ऑक्टोबर १९३४) हे संत...
(काही फरक नाही)

१४:४२, ९ जुलै २०१७ ची आवृत्ती

ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते (जन्म : बुलढाणा, ३० ऑक्टोबर १९३४) हे संत साहित्यावर लेखन करणारे व संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणारे मराठी कीर्तनकार आहेत. वयच्या ९व्या वर्षापासून त्यांनी कुटुंबीयांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरू केली.

संत साहित्याची विशेष आवड असल्याने वक्ते यांनी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले होते. १९५४ ते १९५८ या काळात त्यांनी साखरे महाराज मठातील नीलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. पुढे १९९२ पर्यंत त्यांनी पंढरपुरी राहून त्या काळातील ह.भ.प. परभणीकर गुरुजी, भगवानशास्त्री धारूरकर, गोपाळशास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा अभ्यास केला.

वक्ते यांनी संपादित केलेले ग्रंथ

ʻसंत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमनʼ, ʻमुक्ताबाई चरित्रʼ, ʻविठ्ठल अष्टोत्तरनामʼ, ‘विठ्ठल कवचʼ, ʻविठ्ठल सहस्रनामʼ, ʻविठ्ठल स्तवराजʼ, ʻविठ्ठल हृदयʼ, ʻज्ञानेश्वर दिग्विजयʼ, अशा अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे.

समाजसेवा

ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन, प्रवचनांद्वारे मानवतावादी सेवा ६०हून अधिक वर्षे अखंड सुरू असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधक राष्ट्र जीर्णोद्धाराचे कार्य करत आहेत.

पुरस्कार

महाराष्ट्र सरकारकडून संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला आहे..