"वाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) छो added Category:भाषा using HotCat |
|||
ओळ २७: | ओळ २७: | ||
ही चर्चा ज्या ठिकाणी, ज्या लोकांच्या उपस्थितीत चालते तिला वादसभा म्हंटले आहे. तिचेही स्वरूप विशिष्ट प्रकारचे असते, असे न्यायसूत्रात सांगतिले आहे. या सभेचे चार घटक असतात : वादी, प्रतिवादी, सभापति आणि प्राश्निक.<ref>भारतीय तर्कशास्त्र प्रवेश,पाने २०८, पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७)सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१</ref> |
ही चर्चा ज्या ठिकाणी, ज्या लोकांच्या उपस्थितीत चालते तिला वादसभा म्हंटले आहे. तिचेही स्वरूप विशिष्ट प्रकारचे असते, असे न्यायसूत्रात सांगतिले आहे. या सभेचे चार घटक असतात : वादी, प्रतिवादी, सभापति आणि प्राश्निक.<ref>भारतीय तर्कशास्त्र प्रवेश,पाने २०८, पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७)सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१</ref> |
||
==वादसभेची रचना== |
|||
==हिंदू तत्त्वज्ञानातील विविध वाद== |
|||
अक्रियवाद, अद्वैतवाद, अनिश्चयवाद, अज्ञेयवाद, कर्मवाद, गूढवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, नियतिवाद, भोगवाद, भौतिकवाद (यदृच्छावाद), मायावाद, संन्यासवाद, सांख्यवाद, ज्ञानवाद, ज्ञानसंरचनावाद, वगैरे. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
२३:५०, २ जुलै २०१७ ची आवृत्ती
वाद ही चर्चा करण्याची पद्धती आहे. वाद या संस्कृत शब्दाचे इंग्रजी भाषांतर debate किंवा discussion असे करण्यात येते. संस्कृत भाषेतील विशिष्ट अर्थ असलेला हा शब्द संस्कृत भाषेतील त्या विशिष्ट अर्थानेच इतर भारतीय भाषांमध्ये झिरपला आहे.
न्यायदर्शन
'वाद' ही वैदिक षड्दर्शन परंपरेतील न्यायदर्शन या नावाने ओळखल्या जाणार्या तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे. न्यायशास्त्रास भारतीय तर्कशास्त्र म्हंटले जाते. हे दर्शन अक्षपाद गौतम या ऋषींनी रचले आहे. न्यायसूत्रे हा न्यायदर्शनाचा मूलग्रंथ मानला जातो. या ग्रंथातील पहिल्या सूत्रात 'वाद' शब्द येतो. तो एक पदार्थ मानला आहे. हे सूत्र असे आहे -
प्रमाण-प्रमेय-संशय-प्रयोजन-दृष्टान्त-सिद्धान्तावयव-तर्क-निर्णय-वाद-जल्प-वितण्डा-हेत्वाभास-च्छल-जाति-निग्रहस्थानानाम् तत्त्वज्ञानात् निःश्रेयसाधिगमः
अर्थ : प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्डा, हेत्वाभास, छल, जाति आणि निग्रहस्थान या तत्त्वांच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो.
वादविवाद
वाद, जल्प, वितण्डा या तीन पदार्थांनी मिळून वादविवाद ही संकल्पना बनते. ही चर्चेची प्राचीन भारतीय रीत आहे. वाद, जल्प, वितण्डा यांना वादाचे प्रकार मानले जाते. वाद शास्त्रोक्त पद्धतीने, नियमाप्रमाणे न होता त्यात बाचाबाची होते किंवा दुसर्याच्या वर्मावर बोट ठेवण्यात येते तेंव्हा त्यास 'वितंडवाद' म्हंटले जाते.[१]वादप्रक्रियेचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती वाद, जल्प, वितण्डा या तीन घटकांनी बनते.
वाद
"एखाद्या विषयातील तत्त्व कळावे एवढ्याच हेतूने जी चर्चा केलेली असते तिला वाद म्हणतात." त्यामुळी वादात बुद्धिपुरःसर खोटे हेतू, हे पुरावा म्हणून सादर केले जात नाहीत. यदाकदाचित अज्ञानाने केलेच गेले तर प्रतिपक्षाने त्यातील दोष दाखविताच तो हेतू मागे घेतला जातो. सुचत असल्यास दुसरा हेतू पुढे करून चर्चा सुरूच राहते. न्यायसूत्रात वादाची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे:
- " प्रमाणतर्कसाधनोपलम्भः सिद्धान्त-अविरुद्धः पञ्चवयवोपपन्नः पक्षप्रतिपक्षपरिग्रहो वादः।"[२]
- अर्थ : प्रमाण व तर्क या साधनांचा उपयोग करून पक्ष व प्रतिपक्ष यांच्यामध्ये सिद्धान्तावर लक्ष ठेवून पञ्चावयवी वाक्यांच्या मदतीने झालेली चर्चा म्हणजे वाद होय.[३]
जल्प
पण चर्चेचा उद्देशच दुसर्याचा पाडाव करून स्वतः विजयी होणे हा असतो तेथे कोण कोठे चुकतो यावरच मुख्य कटाक्ष ठेवून चर्चा चालते आणि अशा चर्चेत थोडी चूक झाली की जो चूक करेल त्याचा पराभव झाला असे ठरवून प्रतिपक्ष विजयी ठरतो (म्हणजे स्वतःच तशी घोषणा करतो) आणि चर्चा बंद होते. या प्रकाराला 'जल्प' म्हणतात.[४][५]जेथे ही चर्चा बंद होते त्या ठिकाणाला म्हणजे मुद्द्याला 'निग्रहस्थान' म्हणतात.[६][७]
वितण्डा
'जल्प'मध्ये पक्ष व प्रतिपक्ष या दोघांना आपापली मते तरी असतात, पण कित्येक चर्चा तशा नसतात. त्यात प्रतिवादीला स्वतःचा असा कोणताच पक्ष नसतो, तर फक समोरचा माणूस किंवा वादी जे काही मांडेल त्याचे फक्त खंडन करावयाचे, हाच हेतू असतो, तेच धोरण असते; आणि असे करून आपला विजय मिळवावयाचा असतो; त्यास 'वितण्डा' म्हणतात.म्हणून 'वितण्डा' हा जल्पाचाच एक विशेष प्रकार आहे.[८]
वादसभा
ही चर्चा ज्या ठिकाणी, ज्या लोकांच्या उपस्थितीत चालते तिला वादसभा म्हंटले आहे. तिचेही स्वरूप विशिष्ट प्रकारचे असते, असे न्यायसूत्रात सांगतिले आहे. या सभेचे चार घटक असतात : वादी, प्रतिवादी, सभापति आणि प्राश्निक.[९]
वादसभेची रचना
हिंदू तत्त्वज्ञानातील विविध वाद
अक्रियवाद, अद्वैतवाद, अनिश्चयवाद, अज्ञेयवाद, कर्मवाद, गूढवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, नियतिवाद, भोगवाद, भौतिकवाद (यदृच्छावाद), मायावाद, संन्यासवाद, सांख्यवाद, ज्ञानवाद, ज्ञानसंरचनावाद, वगैरे.
संदर्भ
- ^ पदार्थविचार,प्रकरण १, पान १३, भारतीय तर्कशास्त्राची रूपरेषा, सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि क्रांतिप्रभा पांडे, परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे, पहिली आवृत्ती १९८५
- ^ [http://www.jainkosh.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6
- ^ वादप्रक्रिया, प्रकरण २, पान २२, भारतीय तर्कशास्त्राची रूपरेषा, सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि क्रांतिप्रभा पांडे, परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे, पहिली आवृत्ती १९८५
- ^ वादप्रक्रिया, प्रकरण २, पान २२, भारतीय तर्कशास्त्राची रूपरेषा, सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि क्रांतिप्रभा पांडे, परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे, पहिली आवृत्ती १९८५
- ^ भारतीय तर्कशास्त्र प्रवेश, पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, पाने २०३-४, प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७) सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१
- ^ वादप्रक्रिया, प्रकरण २, पान २२, भारतीय तर्कशास्त्राची रूपरेषा, सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि क्रांतिप्रभा पांडे, परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे, पहिली आवृत्ती १९८५
- ^ भारतीय तर्कशास्त्र प्रवेश,पाने २०३-४, पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, ,प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७)सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१
- ^ भारतीय तर्कशास्त्र प्रवेश, पाने २०३-४पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, ,प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७)सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१
- ^ भारतीय तर्कशास्त्र प्रवेश,पाने २०८, पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७)सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१