"वैजयंती पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. वैजयंती पटवर्धन या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. |
डॉ. वैजयंती संजीव पटवर्धन (माहेरच्या वैजयंती देशपांडे) या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. विवाहानंतर १९८९च्या सुमारास त्या पुण्यात आल्या. सातारा रस्त्यावरील पटवर्धन हॉस्पिटलचे काम ते आणि त्यांचे पती डॉ. संजीव पटवर्धन असे एकत्रितपणे पाहात. होतो |
||
वैजयंतीबाईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील अ.भि. गोरेगावकर शाळेतून झाले. त्यांच्या आई मीना देशपांडे या शिक्षिका होत्या तर वडील सरकारी नोकरीत होते. वैजयंती |
वैजयंतीबाईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील अ.भि. गोरेगावकर शाळेतून झाले. त्यांच्या आई मीना देशपांडे या शिक्षिका होत्या तर वडील मधुकर देशपांडे हे सरकारी नोकरीत होते. वैजयंती मुंबईत राहूनच एम.बी.बी.एस., एम.डी. झाल्या. शाळेत असल्यापासून त्यांना मराठी वाचनाची आवड होती. आजही त्यांचे मराठी वाङ्मयाचे दांडगे वाचन आहे. याचा परिणाम म्हणून त्या ललित लेखनही करतात. त्यांनी आणि त्यांच्या पतींनी मिळून इ.स. २००० साली ‘औक्षवंत’ हा दिवाळी अंक सुरू केला. स्वतःच्या आरोग्यात स्वतःचाच सहभाग वाढावा या उद्देशाने वाचकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवाळी अंकात बाल, महिला कुटुंब, आरोग्य, वार्धक्य, पालकत्व असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. त्याकरिता डॉ. [[ह.वि. सरदेसाई]], डॉ. [[जगदीश हिरेमठ]], डॉ. [[वैजयंती खानविलकर]], डॉ. श्रीराम गीत यांसारख्या मान्यवरांनी लेखन केले. अंकाकरिता लेख आणून त्याचे संपादन करण्याचे काम पटवर्धन पतीपत्नी करीत असत. ‘औक्षवंत’ दिवाळी अंकाच्या दहा वर्षांच्या प्रवासात या अंकाला सात वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेची डोंबिवली शाखा, रोटरी क्लब अशा संस्थांचे पुरस्कार लाभले. |
||
वैजयंती पटवर्धन सन २००६-०७ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(आयआयएम)च्या पुणे शाखेची अध्यक्षा झाल्या. शाखेच्या स्थापनेपासून एकही महिला अध्यक्ष झाली नसल्याने ५० वर्षांतील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध उपक्रमांसाठी आणि वाचनसंस्कृती वाढविण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. आयएमएच्या ‘आरोग्यदीप’ या अंकाच्या संपादकपदाचे काम त्यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत सांभाळले. पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या दिवाळी अंकांकरिताही त्यांनी लेखन केले. याशिवाय वैजयंती पटवर्धनांनी विविध वृत्तपत्रांतून आणि मसिकांतून अनेक स्त्रीकेंद्रित कथा लिहिल्या. |
वैजयंती पटवर्धन सन २००६-०७ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(आयआयएम)च्या पुणे शाखेची अध्यक्षा झाल्या. शाखेच्या स्थापनेपासून एकही महिला अध्यक्ष झाली नसल्याने ५० वर्षांतील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध उपक्रमांसाठी आणि वाचनसंस्कृती वाढविण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. आयएमएच्या ‘आरोग्यदीप’ या अंकाच्या संपादकपदाचे काम त्यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत सांभाळले. पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या दिवाळी अंकांकरिताही त्यांनी लेखन केले. याशिवाय वैजयंती पटवर्धनांनी विविध वृत्तपत्रांतून आणि मसिकांतून अनेक स्त्रीकेंद्रित कथा लिहिल्या. |
||
समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याकरिता लेखन हेच एकमेव उत्तम साधन आहे, हे उमगल्यामुळे, पुणे महापालिकेमध्ये |
समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याकरिता लेखन हेच एकमेव उत्तम साधन आहे, हे उमगल्यामुळे, पुणे महापालिकेमध्ये गर्भिलिंगनिदान कायद्याविषयीच्या समितीसाठी २००३ ते २०१० या कालावधीत काम करताना व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरांसोबतच वैजयंती पटवर्धनांचे लेखन सुरू होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करताना त्यांनी ‘दिवा लागो देवा’ या लघुपटाचे त्यांनी निर्मिती केली. पुणे महापालिकेच्या कार्यक्रमांत व कार्यशाळांमध्ये १८ मिनिटांचा हा लघुपट दाखवून जनजागृती केली जात असते.. |
||
==वैजयंती पटवर्धन यांची पुस्तके== |
==वैजयंती पटवर्धन यांची पुस्तके== |
१६:५७, १ जुलै २०१७ ची आवृत्ती
डॉ. वैजयंती संजीव पटवर्धन (माहेरच्या वैजयंती देशपांडे) या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. विवाहानंतर १९८९च्या सुमारास त्या पुण्यात आल्या. सातारा रस्त्यावरील पटवर्धन हॉस्पिटलचे काम ते आणि त्यांचे पती डॉ. संजीव पटवर्धन असे एकत्रितपणे पाहात. होतो
वैजयंतीबाईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील अ.भि. गोरेगावकर शाळेतून झाले. त्यांच्या आई मीना देशपांडे या शिक्षिका होत्या तर वडील मधुकर देशपांडे हे सरकारी नोकरीत होते. वैजयंती मुंबईत राहूनच एम.बी.बी.एस., एम.डी. झाल्या. शाळेत असल्यापासून त्यांना मराठी वाचनाची आवड होती. आजही त्यांचे मराठी वाङ्मयाचे दांडगे वाचन आहे. याचा परिणाम म्हणून त्या ललित लेखनही करतात. त्यांनी आणि त्यांच्या पतींनी मिळून इ.स. २००० साली ‘औक्षवंत’ हा दिवाळी अंक सुरू केला. स्वतःच्या आरोग्यात स्वतःचाच सहभाग वाढावा या उद्देशाने वाचकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवाळी अंकात बाल, महिला कुटुंब, आरोग्य, वार्धक्य, पालकत्व असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. त्याकरिता डॉ. ह.वि. सरदेसाई, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. वैजयंती खानविलकर, डॉ. श्रीराम गीत यांसारख्या मान्यवरांनी लेखन केले. अंकाकरिता लेख आणून त्याचे संपादन करण्याचे काम पटवर्धन पतीपत्नी करीत असत. ‘औक्षवंत’ दिवाळी अंकाच्या दहा वर्षांच्या प्रवासात या अंकाला सात वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेची डोंबिवली शाखा, रोटरी क्लब अशा संस्थांचे पुरस्कार लाभले.
वैजयंती पटवर्धन सन २००६-०७ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(आयआयएम)च्या पुणे शाखेची अध्यक्षा झाल्या. शाखेच्या स्थापनेपासून एकही महिला अध्यक्ष झाली नसल्याने ५० वर्षांतील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध उपक्रमांसाठी आणि वाचनसंस्कृती वाढविण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. आयएमएच्या ‘आरोग्यदीप’ या अंकाच्या संपादकपदाचे काम त्यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत सांभाळले. पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या दिवाळी अंकांकरिताही त्यांनी लेखन केले. याशिवाय वैजयंती पटवर्धनांनी विविध वृत्तपत्रांतून आणि मसिकांतून अनेक स्त्रीकेंद्रित कथा लिहिल्या.
समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याकरिता लेखन हेच एकमेव उत्तम साधन आहे, हे उमगल्यामुळे, पुणे महापालिकेमध्ये गर्भिलिंगनिदान कायद्याविषयीच्या समितीसाठी २००३ ते २०१० या कालावधीत काम करताना व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरांसोबतच वैजयंती पटवर्धनांचे लेखन सुरू होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करताना त्यांनी ‘दिवा लागो देवा’ या लघुपटाचे त्यांनी निर्मिती केली. पुणे महापालिकेच्या कार्यक्रमांत व कार्यशाळांमध्ये १८ मिनिटांचा हा लघुपट दाखवून जनजागृती केली जात असते..
वैजयंती पटवर्धन यांची पुस्तके
- जन्म बाळाचा आणि आईचाही (सहलेखक - वैद्य य. गो. जोशी)
- माझं सोनुलं
वैजयंती पटवर्धन यांचे संपादन
- आरोग्यदीप (मासिक, सन २०१२ ते २०१४)
- औक्षवंत दिवाळी अंक (सन २००० ते २०१०)
वैजयंती पटवर्धन यांची निर्मिती असलेले लघुपट
- कवितेचे गाणे होताना (यू-ट्यूबवरील वेब मालिका, निर्मिती आणि निवेदन, सहभाग - डॉ. सलिल कुलकर्णी))
- दिवा लागो देवा
(अपूर्ण)