"विश्वास फडतरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →कौटुंबिक |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==कौटुंबिक== |
==कौटुंबिक== |
||
विश्वस फडतरे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिताराजे पवार यांचे बंधू होते; तसेच लेह ते कन्याकुमारी सलग प्रवास करून '[[लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड]]' करणार्या [[विनया केत]] या त्यांच्या कन्या होत. |
विश्वस फडतरे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिताराजे पवार यांचे बंधू होते; तसेच लेह ते कन्याकुमारी सलग प्रवास करून '[[लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड]]' करणार्या [[विनया केत]] या त्यांच्या कन्या होत. |
||
==कायझेन (पुस्तक)== |
|||
हे पुस्तक संक्षिप्त आवृत्तीमध्येसुद्धा उपलब्ध आहे. |
|||
१७:३४, २७ मे २०१७ ची आवृत्ती
‘कायझेन’ हे एकच पुस्तक लिहून प्रसिद्ध झालेले विश्वास फडतरे (जन्म : इ.स. १९५४; मृत्यू : इ.स. २०१७) हे कायझेन तज्ज्ञ होते.
विश्वास फडतरे हे सुरुवातीला पुण्यातील राजा बहादूर कंपनीत कामगार अधिकारी होते. त्यानंतर मिल्टन कंपनीतही काही काळ ते व्यवस्थापक होते. पुढे ते पुण्यातील लुल्लानगर भागात असलेल्या वेडझेन इन्स्टिट्यूट्मध्ये आणि एकूण व्यवसाय क्षेत्रात कायझेन तज्ज्ञ म्हणून ते नामाकिंत होते.
कायझेन म्हणजे काय
कायझेन हा जपानी शब्द आहे. त्या अर्थ सततची सुधारणा, चांगल्यासाठी बदल आणि हे सारे करायचे ते आनंदासाठी असा आहे. विश्वास फडतरे यांनी त्यांच्या पुस्तकात कायझेनची संकल्पना सविस्तरपणे स्पष्ट केली आहे. बारा प्रकरणांमध्ये त्यांनी यशाच्या टप्प्यापर्यंत कसे जायचे ते सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहे. संघभावना, सकारात्मक दृष्टिकोन याबरोबरच आत्मविश्वासाने कसे काम करायचे, याबद्दल त्यांनी केलेले मार्गदर्शन केवळ उद्योग क्षेत्रातच उपयुक्त ठरणारे आहे, असे नसून व्यक्तिगत आयुष्यातही कायझेन प्रणालीचा वापर केल्यास खूप फायदा होतो. शास्त्रीय विषय असूनही फडतरे यांनी रंजक शैलीत हे सारे समजावून दिले आहे.
कौटुंबिक
विश्वस फडतरे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिताराजे पवार यांचे बंधू होते; तसेच लेह ते कन्याकुमारी सलग प्रवास करून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' करणार्या विनया केत या त्यांच्या कन्या होत.
कायझेन (पुस्तक)
हे पुस्तक संक्षिप्त आवृत्तीमध्येसुद्धा उपलब्ध आहे.