"किशोर धनकुडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: किशोर धनकुडे हा एक मराठी गिर्यारोहक आहे. सचिन तेंडुलकरसारखा दिस... |
(काही फरक नाही)
|
००:५२, २४ मे २०१७ ची आवृत्ती
किशोर धनकुडे हा एक मराठी गिर्यारोहक आहे. सचिन तेंडुलकरसारखा दिसतो म्हणून किशोरला लोक गिर्यारोहणातील सचिन म्हणतात.
स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात असलेल्या किशोरला काही मित्रांमुळे गिर्यारोहणाची आवड लागली. मग त्याने स्वतःला यात अक्षरशः झोकून दिले. सह्याद्रीच्या रांगातील दीडशेहून अधिक किल्ले त्याने सर केले.
दोन वर्षे अथक परिश्रम केल्यानंतर २०१४ साली किशोर धनकुडेने उत्तरेकडून म्हणजे चीनच्या बाजूने माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्याचा आत्मविश्वास वाढला. पुढच्याच वर्षी दक्षिणेकडच्या बाजूनेही एव्हरेस्ट गाठायचे, असा त्याचा विचार होता. पण दुर्दैवाने त्या वेळी हिमकडे कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे प्रशासनाने सर्व मोहिमा स्थगित केल्या होत्या.
त्याकाळात किशोरने धावण्यावर लक्ष केंद्रित केले. पुढच्या काळात पुणे आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन त्याने एक तास तीस मिनिटांत, मुंबई-पुणे मेरेथॉन साडेतीन तासांत, तर आफ्रिकेतील "कॉम्रेड मॅरेथॉन' (८९ कि.मी.) साडेनऊ तासात पूर्ण करून या क्षेत्रातील प्रभुत्वही सिद्ध केले.
अर्थातच "माऊंट एव्हरेस्ट' किशोरच्या डोक्यातून गेले नव्हतेच. २० मे २०१७ला सकाळीच किशोरने दक्षिणेकडून म्हणजे नेपाळच्या बाजूकडून हे शिखर गाठल्याची बातमी आली.