किशोर धनकुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किशोर धनकुडे हा माउंट एव्हरेस्ट शिखर उत्तर आणि दक्षिण बाजूंनी सर केलेला एक मराठी गिर्यारोहक आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात असलेल्या किशोरला काही मित्रांमुळे गिर्यारोहणाची आवड लागली. सह्याद्रीच्या रांगातील दीडशेहून अधिक किल्ले त्याने सर केले आहेत.

दोन वर्षे तयारी केल्यानंतर २०१४ साली किशोर धनकुडेने उत्तरेकडून म्हणजे चीनच्या बाजूने माऊंट एव्हरेस्ट सर केले. पुढील वर्षी एव्हरेस्टवर हिमकडे कोसळल्यामुळे प्रशासनाने सर्व मोहिमा स्थगित केल्या व त्यामुळे धनकुडे याला पुन्हा चढाई करता आली नाही.

त्यानंतर त्याने पुणे आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन त्याने एक तास तीस मिनिटांत, मुंबई-पुणे मेरेथॉन साडेतीन तासांत, तर आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन (८९ कि.मी.) साडेनऊ तासात पूर्ण केली.

२० मे २०१७ला सकाळी धनकुडेने दक्षिणेकडून म्हणजे नेपाळच्या बाजूकडून एव्हरेस्ट सर केले.

सचिन तेंडुलकरसारखा दिसत असल्याने धनकुडे याला लोक गिर्यारोहणातील सचिन म्हणतात.