"नितीन करमाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. नितीन रघुनाथ करमाळकर (जन्म ११ जानेवारी १९६२) हे पुणे विद्याप...
(काही फरक नाही)

२३:३४, १९ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. नितीन रघुनाथ करमाळकर (जन्म ११ जानेवारी १९६२) हे पुणे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू आहेत. त्यांनी १८ मे २०१७ रोजी या पदाचा कार्यभाग स्वीकारला. ते यापूर्वी २५ वर्षे याच विद्यापीठात अध्यापनाचे काम करीत होते. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, विद्यापरिषद, अधिसभा आदी मंडळांवर व समित्यांवर त्यांनी काम केले आहे.

शिक्षण

मूळ कणकवलीचे असलेले डॉ. करमळकर यांनी कोल्हापूर विद्यापीठातून बी.एस्‌सी. त्यानंतर ते पुणेकर झाले आणि त्यांनी पुणे विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात एम.एस्‌सी व भूरसायनशस्त्रात पीएच.डी. केली. करमाळकरांचे संशोधन हे प्रामुख्याने अग्निजन्य खडकांविषयी व हिमालयातील विशिष्ट खडकांविषयी आहे. अग्निजन्य खडकांची निर्मितीविषयी महाराष्ट्राबरोबरच कलकत्ता आणि परदेशांत इराण, फ्रान्स, जर्मनी आणि [[ऑस्ट्रेलिया] येथेही त्यांनी संशोधने केली आहेत.

पुणे विद्यापीठातील कारकीर्द

पुणे विद्यापीठात इ.स. १९८८मध्ये प्राध्यापक म्हणून करमाळकर रुजू झाले. विद्यापीठात भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत काम पाहिले. पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे २०१३ पासून २०१७ पर्यंत होती. विद्यापीठातील अनेक प्रशासकीय जबाबदार्‍याही पेलल्या आहेत. विद्यापीठाच्या ‘इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल’चे प्रमुख म्हणून ते २०११ पासून काम पाहत होते. विद्यापीठाच्या अधिसभेचे, परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. २०१७ साली पुणे विद्यापीठाला मिळालेली ‘नॅक’ची अ + श्रेणी, राष्ट्रीय मूल्यांकन प्रणालीत स्थान मिळण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

संशोधन

बंगलोरच्या ‘जिऑलॉजिकल स्टडी ऑफ इंडिया’चे ते सदस्य आहेत.