Jump to content

"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. [[जयंत नारळीकर]]) : (खगोलविज्ञानविषक)
* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. [[जयंत नारळीकर]]) : (खगोलविज्ञानविषक)
* पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
* पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)

==मंगला नारळीकर यांचे प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि ते जेथे प्रकाशित झाले त्या संशोधन पत्रिकांची नावे==
* Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - 1986)
* On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - 1980)
* On orders solely of Abelian Groups (Bulletin of London Mathematical Society - 1988)
* On the Mean Square Value theorem of Hurwitz Zeta function (Proceedings of Indian Academy of Sciences - 1981)
* Science Age या मासिकात सामान्य माणसांना आकर्षित करतील असे अनेक गणितविषयक लेख
* Theory of Sieved Integers (Acta Arithmetica)







१७:३४, १६ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. मंगला नारळीकर (माहेरच्या मंगला राजवाडे) या एक मराठी गणितज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.

शिक्षण

मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या. त्या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक मिळाले

मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द

  • इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून काम.
  • १९६७ ते १९६९ : केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन.
  • पुढे ती नोकरी सोडून त्या आधी मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापक झाल्या.
  • १९७४ ते १९८० : या कालावधीत मंगलाबाई परत टाटा इन्स्टिट्यूटला आल्या व त्यांनी तेथेच संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातली पीएच.डी मिळवली. संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.
  • १९८२ ते ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणितविद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम.
  • याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणार्‍या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
  • १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्‌सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन.
  • २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.
  • सद्‌ आणि सदसत्‌ विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि Topology (संस्थितिशास्त्र) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.

विवाह आणि कुटुंब

१९६५ साली त्यांचा विवाह झाला. जागतिक दर्जाचे गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर हे पती, संस्कृत पंडित सुमती नारळीकर या सासू आणि बनारस विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णु वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी एक बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात आहेत.

डॉ. मंगला नारळीकर यांनी लिहिलेली मराठी/इंग्रजी पुस्तके

  • A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर)
  • An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
  • गणितगप्पा भाग १, २.
  • गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
  • गार्गी अजून जिवंत आहे
  • नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर)  : (खगोलविज्ञानविषक)
  • पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)

मंगला नारळीकर यांचे प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि ते जेथे प्रकाशित झाले त्या संशोधन पत्रिकांची नावे

  • Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - 1986)
  • On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - 1980)
  • On orders solely of Abelian Groups (Bulletin of London Mathematical Society - 1988)
  • On the Mean Square Value theorem of Hurwitz Zeta function (Proceedings of Indian Academy of Sciences - 1981)
  • Science Age या मासिकात सामान्य माणसांना आकर्षित करतील असे अनेक गणितविषयक लेख
  • Theory of Sieved Integers (Acta Arithmetica)



(अपूर्ण)