"भीष्मराज बाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भीष्मराज बाम (जन्म : ; मृत्यू : नाशिक, १२ मे, २०१७) हे महाराष्ट्र राज्... |
(काही फरक नाही)
|
२२:१०, १२ मे २०१७ ची आवृत्ती
भीष्मराज बाम (जन्म : ; मृत्यू : नाशिक, १२ मे, २०१७) हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते.
बाम यांनी उस्मानिया विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स हा त्यांचा विषय होता. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन्डन्ट ऑफ पोलिस या पदावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात दाखल झाले व १८ वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केले त्यानंतर त्यांची गृहमंत्रालयात डेप्युटेशनवर बदली झाली. शेवटी शेवटी ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे प्रेसिडेन्ट म्हणून काम करत होते.
भीष्मराज बाम यांच्या Winning habit ह्या पुस्तकाचे हिंदी, मराठी, तामिळ व पंजाबी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रकाशित होणार्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्ष संपादक होते.
भीष्मराज बाम यांनी लिहिलेली पुस्तके
- मना सज्जना (आध्यात्मिक)
- मार्ग यशाचा (अनुवादित, मूळ इंग्रजी - Winning Habit)
- विजयाचे मानसशास्त्र
- संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती
पुरस्कार
- महारष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार (२०११-१२)
- पोलिस महासंचालकपदी असताना मानाचे राष्ट्रपती पदक