"कागदीपुर्यातला गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पुण्याच्या कसबा पेठेतील कागदीपुर्यात गणपतीची एक वैशिष्ट्यपूर... |
(काही फरक नाही)
|
२२:५३, ९ मे २०१७ ची आवृत्ती
पुण्याच्या कसबा पेठेतील कागदीपुर्यात गणपतीची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. कागदीपुरा ही साततोटी पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेली पुण्यातली अगदी जुनी वस्ती आहे. कागदीपुर्यातल्या या मूर्तीची विशेषता म्हणजे येथे एकाच दगडातून बनवलेला गणपती आणि शिवलिंग आहे. साधारणतः गणपतीची मूर्ती जमिनीपासून थोडी उंचावर असते. मात्र या देवळात गणपती जमिनीलगत आहे. जणू काही तो शिवलिंगाची पूजा करतो आहे. गणपतीची मूर्ती चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे.
या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास ज्ञात नाही
[वर्ग:पुणे]]