Jump to content

"वरद गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख गुपचूप गणपती वरुन वरद गणपती ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[पुणे]] शहरात [[शनिवार वाडा|शनिवारवाड्याकडून]] ओंकारेश्वराकडे येताना नेने घाट-आपटे घाटाकडे जाणार्‍या उजवीकडील रस्त्यावर वळल्यावर समोर हे गणपतीचे देऊळ दिसते. या देवस्थानाची उभारणी [[चिंचवड]] येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली आहे. म्हणून या गणपतीला गुपचूप वरद गणपती म्हणतात. देवळातली गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची ३ फूट आहे. सभामंडप दुमजली असून आत देवतांची जुनी चित्रे, हंड्या व झुंबरे आहेत. गाभार्‍याला कळस असून प्रदक्षिणामार्गावर मागे [[शमी]]चे झाड आहे.
[[पुणे]] शहरात [[शनिवार वाडा|शनिवारवाड्याकडून]] ओंकारेश्वराकडे येताना नेने घाट-आपटे घाटाकडे जाणार्‍या उजवीकडील रस्त्यावर वळल्यावर समोर हे गणपतीचे देऊळ दिसते. या देवस्थानाची उभारणी [[चिंचवड]] येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी इ.स. १८९२मध्ये केली आहे. म्हणून या गणपतीला गुपचूप वरद गणपती म्हणतात. १८९४ साली या मंदिराचा सभामंडप बांधण्यात आला. देवळातली गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची ३ फूट आहे. सभामंडप दुमजली असून आत देवतांची जुनी चित्रे, हंड्या व झुंबरे आहेत. गाभार्‍याला कळस असून प्रदक्षिणामार्गावर मागे एकेकाळी [[शमी]]चे झाड होते.

मोठा लाकडी दरवाजा, दिंडी दरवाजा, लाकडी सभामंडप आणि गाभारा असे या देवळाचे स्वरूप आहे. गणपतीची मूर्ती अष्टविनायकांची आठवण करून देते. अर्धपद्मासनबद्ध अशी ही मूर्ती आहे. गणपतीच्या वरील दोन्ही हातांत शस्त्रे आहेत. खालचा उजवा हात अभयमुद्रेत, तर डाव्या हातात मोदक आणि त्यावर सोंड आहे. अंगभूत मुकुट नसल्याने गंडस्थळ आणि मोठे कान स्पष्ट दिसतात.

[[लोकमान्य टिळक]] वरद गणपतीच्या दर्शनास येत असत. [[पानशेत]]च्या पुरात सबंध मंदिर पाण्याखाली गेले तरी मंदिरास काही हानी पोचली नाही.

हे वरद गणपती मंदिर सकाळी ७ ते अ२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उघडे असते.







१७:०५, ९ मे २०१७ ची आवृत्ती

पुणे शहरात शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वराकडे येताना नेने घाट-आपटे घाटाकडे जाणार्‍या उजवीकडील रस्त्यावर वळल्यावर समोर हे गणपतीचे देऊळ दिसते. या देवस्थानाची उभारणी चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी इ.स. १८९२मध्ये केली आहे. म्हणून या गणपतीला गुपचूप वरद गणपती म्हणतात. १८९४ साली या मंदिराचा सभामंडप बांधण्यात आला. देवळातली गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची ३ फूट आहे. सभामंडप दुमजली असून आत देवतांची जुनी चित्रे, हंड्या व झुंबरे आहेत. गाभार्‍याला कळस असून प्रदक्षिणामार्गावर मागे एकेकाळी शमीचे झाड होते.

मोठा लाकडी दरवाजा, दिंडी दरवाजा, लाकडी सभामंडप आणि गाभारा असे या देवळाचे स्वरूप आहे. गणपतीची मूर्ती अष्टविनायकांची आठवण करून देते. अर्धपद्मासनबद्ध अशी ही मूर्ती आहे. गणपतीच्या वरील दोन्ही हातांत शस्त्रे आहेत. खालचा उजवा हात अभयमुद्रेत, तर डाव्या हातात मोदक आणि त्यावर सोंड आहे. अंगभूत मुकुट नसल्याने गंडस्थळ आणि मोठे कान स्पष्ट दिसतात.

लोकमान्य टिळक वरद गणपतीच्या दर्शनास येत असत. पानशेतच्या पुरात सबंध मंदिर पाण्याखाली गेले तरी मंदिरास काही हानी पोचली नाही.

हे वरद गणपती मंदिर सकाळी ७ ते अ२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उघडे असते.