Jump to content

"गांधीतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गांधीतीर्थ हे जळगाव शहरातले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी ए...
(काही फरक नाही)

१२:५५, २८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

गांधीतीर्थ हे जळगाव शहरातले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी एका टेकडीवजा भागांत विविध प्रकारच्या झाडांनी, वेलींनी बहरलेला परिसर आहे. आंबा, गुलमोहर, कडुनिंब, विविध रंगांच्या बोगनवेली व आणखी बर्‍याच प्रकारचे वृक्ष या ठिकाणी डोलताना दिसतात.

गांधीतीर्थाच्या टेकडीवर भंवरलाल जैन यांच्या परिश्रमातून निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय उद्योग समूह आहे. या समूहातर्फे फळांवर प्रक्रिया करणे, कांदा निर्जलीकरण, टिश्यू्कल्चरने केळीच्या झाडांची रोपे तयार करणे, शेतकर्‍यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणे, शेतीची अवजारे बनविणे, बायोगॅस निर्मिती, ठिबक सिंचन, झाडांसाठी खत बनविणे अशी विविध प्रकारची कामे चालतात.

गांधीतीर्थावर चित्रपट, चित्रे व पुतळे यांच्या माध्यमांतून महात्मा गांधींच्या जीवनप्रवासाची माहिती उलगडून दाखवणारे अद्ययावत वातानुकूलित म्युझियम आहे. म्युझियम बघितल्यावर एक जिवंत इतिहास डोळ्यांपुढे तरळतो. महत्त्वाचे म्हणजे येथे एक अभ्यासिका आहे. गांधीजींसंदर्भांतील आणि त्यांना आवडणार्‍या विषयांतील अनेक मोलाचे ग्रंथ येथे आहेत. एखाद्याला त्याच्या आवडीच्या कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल, तर येथे अभ्यासकांसाठी आरामदायी खोल्याही आहेत. अभ्यासकांनी यावे व येथे निवांत अभ्यास करीत बसावे, अशी ‘गांधीतीर्थ’ची उभारणी करणार्‍यांची इच्छा असावी.