"सौर कालगणना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
चांद्र कालगणनेप्रमाणे या सौर कालगणनेत महिन्यांची नावे [[चैत्र]], [[वैशाख]] अशीच आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र या दिवशी असतो. त्यालाच 'वसंतसंपातदिन' असे म्हणतात. या |
चांद्र कालगणनेप्रमाणे या सौर कालगणनेत महिन्यांची नावे [[चैत्र]], [[वैशाख]] अशीच आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र या दिवशी असतो. त्यालाच 'वसंतसंपातदिन' असे म्हणतात. या दिवसापासून सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो. सौर दिनांक १ [[आषाढ]] या दिवशी तो उत्तरतम अंतरावर येतो. त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. सौर दिनांक १ आश्विन रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर १ पौष या दिवशी सूर्याची उत्तरेकडे वाटचाल सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या कालगणनेत निश्चित केला आहे. या कालगणनेतील प्रत्येक महिनासुद्धा सूर्याच्या संक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्यांचे ३० अथवा ३१ दिवस निश्चित केले आहेत. भारतीय सौर आणि ग्रेगोरिअन महिन्याचे आरंभदिवस वेगळे असल्याने एका ग्रेगोरिअन महिन्यात २ सौर महिन्यांचे थोडे थोडे दिवस येतात. भारतामध्ये अनेक सण आणि धार्मिक कृत्ये चंद्राच्या तिथीवर आधारित आहेत तथापि [[ऋतू|ऋतु]]चक्राशी जवळचा संबंध असणारी सौर कालगणना ही शास्त्रीयदृष्ट्या अधिक उचित आहे. भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू|पं. जवाहरलाल नेहरू]] यांच्या पुढाकाराने डॉ. [[मेघनाद साहा]] यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कालगणनेची ही पद्धत शोधली. सरकारने इ.स. १९५७ पासून ही कालगणना सार्वजनिकरीत्या प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात भारतीय जनतेमध्ये ही कालगणना कधीच लोकप्रिय होऊ शकली नाही. {१} |
||
== संदर्भ व नोंदी== |
== संदर्भ व नोंदी== |
२१:०७, ११ मार्च २०१७ ची आवृत्ती
चांद्र कालगणनेप्रमाणे या सौर कालगणनेत महिन्यांची नावे चैत्र, वैशाख अशीच आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र या दिवशी असतो. त्यालाच 'वसंतसंपातदिन' असे म्हणतात. या दिवसापासून सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो. सौर दिनांक १ आषाढ या दिवशी तो उत्तरतम अंतरावर येतो. त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. सौर दिनांक १ आश्विन रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर १ पौष या दिवशी सूर्याची उत्तरेकडे वाटचाल सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या कालगणनेत निश्चित केला आहे. या कालगणनेतील प्रत्येक महिनासुद्धा सूर्याच्या संक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्यांचे ३० अथवा ३१ दिवस निश्चित केले आहेत. भारतीय सौर आणि ग्रेगोरिअन महिन्याचे आरंभदिवस वेगळे असल्याने एका ग्रेगोरिअन महिन्यात २ सौर महिन्यांचे थोडे थोडे दिवस येतात. भारतामध्ये अनेक सण आणि धार्मिक कृत्ये चंद्राच्या तिथीवर आधारित आहेत तथापि ऋतुचक्राशी जवळचा संबंध असणारी सौर कालगणना ही शास्त्रीयदृष्ट्या अधिक उचित आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने डॉ. मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कालगणनेची ही पद्धत शोधली. सरकारने इ.स. १९५७ पासून ही कालगणना सार्वजनिकरीत्या प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात भारतीय जनतेमध्ये ही कालगणना कधीच लोकप्रिय होऊ शकली नाही. {१}
संदर्भ व नोंदी
१. ज्ञान प्रबोधिनी आणि धर्मनिर्णय मंडळ पुरस्कृत राष्ट्रीय दिनदर्शिका