Jump to content

"रोहित देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २७ डिसेंबर २०१६ रोजी अ‍ॅड. रोहित देव (जन्म : इ.स. १९६५) हे महाराष्ट्र...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
देव विद्यार्थिदशेत काही काळ पत्रकार म्हणून काम करत होते. आता बंद पडलेल्या नागपूरच्या एका वर्तमानपत्रात त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली होती. न्यायालयात दाखल करण्यात येणार्‍या प्रकरणांचा मसुदा तयार करण्यात ते तरबेज आहेत. [[देवेंद्र फडणवीस]] व [[नितीन गडकरी]] या दोन्ही नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा देव यांनीच त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली होती. अनुशेषाच्या मुद्दय़ावर राज्यपालांनी दिलेले निर्देश सरकारने पाळणे बंधनकारक आहे की नाही, या मुद्द्यावरचा तत्कालीन सरकारतर्फे गुलाम वहानवटी यांनी केलेला युक्तिवाद देव यांनी खोडून काढला होता व फडणवीस आणि गडकरी हा लढा जिंकले होते.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गैरव्यवहाराच्या आरोपावरून भाजपची सत्ता असलेली नागपूर महानगरपालिका बरखास्त केली होती. नंदलाल समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हाही देव हे फडणवीसांच्या मदतीला धावून आले व त्यांनी न्यायालयीन लढा देत बरखास्तीचा हा निर्णय कसा बेकायदेशीर आहे हे कोर्टात सिद्ध केले.

राज्याच्या विक्रीकर खात्याचे तसेच नागपूर विद्यापीठाचे विशेष वकील म्हणूनही देव यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. देव २०१४ सालापासून नागपूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केंद्र सरकारचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून काम बघत होते.

देव यांच्या पत्‍नी अस्मिता येथील भोसला सैनिकी शाळेत शिक्षिका असून स्वतः रोहित देव हे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे जावई आहेत. देव यांचे मोठे बंधू शिरीष देव भारतीय हवाई दलात एअर मार्शल असून सध्या (डिसेंबर २०१६मध्ये) ते ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत. अरविंद बोबडे, व्ही.आर. मनोहर व अलीकडच्या काळात राजीनामा दिलेले सुनील मनोहर व श्रीहरी अणे यांच्यानंतर देव यांना हा महाधिवक्ता होण्याचा मान मिळाला आहे.
[[वर्ग:महाराष्ट्र सरकार]]

[[वर्ग:मराठी कायदेपंडित]]

००:२८, १२ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

२७ डिसेंबर २०१६ रोजी अ‍ॅड. रोहित देव (जन्म : इ.स. १९६५) हे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता (Advocate General) झाले. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आठ महिन्यांनी राज्याला नवा महाधिवक्ता मिळाला. मात्र या दिरंगाईसाठी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाकडून समज घ्यावी लागली.

श्रीहरी अणे यांजप्रमाणे रोहित देव हे नागपूरचे आहेत. त्यांच्या महाधिवक्तापदावरील निवडीने नागपूरला हा मान पाचव्यांदा मिळाला आहे. देव यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर, डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली. नागपूरचे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर देव यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.

देव विद्यार्थिदशेत काही काळ पत्रकार म्हणून काम करत होते. आता बंद पडलेल्या नागपूरच्या एका वर्तमानपत्रात त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली होती. न्यायालयात दाखल करण्यात येणार्‍या प्रकरणांचा मसुदा तयार करण्यात ते तरबेज आहेत. देवेंद्र फडणवीसनितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा देव यांनीच त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली होती. अनुशेषाच्या मुद्दय़ावर राज्यपालांनी दिलेले निर्देश सरकारने पाळणे बंधनकारक आहे की नाही, या मुद्द्यावरचा तत्कालीन सरकारतर्फे गुलाम वहानवटी यांनी केलेला युक्तिवाद देव यांनी खोडून काढला होता व फडणवीस आणि गडकरी हा लढा जिंकले होते.