Jump to content

"रोहित देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २७ डिसेंबर २०१६ रोजी अ‍ॅड. रोहित देव (जन्म : इ.स. १९६५) हे महाराष्ट्र...
(काही फरक नाही)

००:२४, १२ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

२७ डिसेंबर २०१६ रोजी अ‍ॅड. रोहित देव (जन्म : इ.स. १९६५) हे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता (Advocate General) झाले. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आठ महिन्यांनी राज्याला नवा महाधिवक्ता मिळाला. मात्र या दिरंगाईसाठी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाकडून समज घ्यावी लागली.

श्रीहरी अणे यांजप्रमाणे रोहित देव हे नागपूरचे आहेत. त्यांच्या महाधिवक्तापदावरील निवडीने नागपूरला हा मान पाचव्यांदा मिळाला आहे. देव यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर, डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली. नागपूरचे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर देव यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.

देव विद्यार्थिदशेत काही काळ पत्रकार म्हणून काम करत होते. आता बंद पडलेल्या नागपूरच्या एका वर्तमानपत्रात त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली होती. न्यायालयात दाखल करण्यात येणार्‍या प्रकरणांचा मसुदा तयार करण्यात ते तरबेज आहेत. देवेंद्र फडणवीसनितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा देव यांनीच त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली होती. अनुशेषाच्या मुद्दय़ावर राज्यपालांनी दिलेले निर्देश सरकारने पाळणे बंधनकारक आहे की नाही, या मुद्द्यावरचा तत्कालीन सरकारतर्फे गुलाम वहानवटी यांनी केलेला युक्तिवाद देव यांनी खोडून काढला होता व फडणवीस आणि गडकरी हा लढा जिंकले होते.