Jump to content

"श्रीस्वामी समर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
स्वामी समर्थ, अर्थात अक्कलकोट स्वामी हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील एक गुरू होते.
स्वामी समर्थ, अर्थात अक्कलकोट स्वामी हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील एक गुरू होते.

इ.स. १८५६मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. १८५७ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.
इ.स. १८५६मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. १८५७ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. [[चैत्र शुद्ध द्वितीया]] हा अक्कलकोट स्मामींचा प्रकट दिन समजला जातो.

इसवी सन १८५६मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट गावात प्रवेश केला व तेथे पुढची बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या अक्कलकोट येथे राहण्यामुळे अक्कलकोट हे गाव सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र समजले जाऊ लागले. येथे राहून स्वामी समर्थांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८मध्ये आपला अवतार संपवला. परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील, अशी त्यांच्यावर श्रद्धा असणार्‍यांची समजूत आहे.

२३:३७, ४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

|| श्री स्वामी समर्थ || स्वामी समर्थ, अर्थात अक्कलकोट स्वामी हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील एक गुरू होते.

इ.स. १८५६मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. १८५७ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. चैत्र शुद्ध द्वितीया हा अक्कलकोट स्मामींचा प्रकट दिन समजला जातो.

इसवी सन १८५६मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट गावात प्रवेश केला व तेथे पुढची बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या अक्कलकोट येथे राहण्यामुळे अक्कलकोट हे गाव सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र समजले जाऊ लागले. येथे राहून स्वामी समर्थांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८मध्ये आपला अवतार संपवला. परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील, अशी त्यांच्यावर श्रद्धा असणार्‍यांची समजूत आहे.

अनन्यभावाने भक्ती करणार्‍या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ’भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे’ असे अभिवचन स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना दिले.

स्वामी समर्थ महाराजांची काही चरित्रे

  • गुरुलीलामृत
  • चरित्र सारामृत

महाराजांचा स्वामी समर्थ तारक मंत्र

!! “स्वामी समर्थ तारक मंत्र” !!

निःशंक हो रे मना | निर्भय हो रे मना |

प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना ||

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |

स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||

आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला |

परलोकी ही ना भीती तयाला ||

अशक्य ही शक्य करतील स्वामी || २ ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे |

जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ||

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा |

नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||

अशक्य ही शक्य करतील स्वामी || ३ ||

खरा होई जागा | श्रद्धेसहित |

कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||

कितीदा दिला बोल त्यांनीच हात |

नको डगमगू | स्वामी देतील साथ ||

अशक्य ही शक्य करतील स्वामी || ४ ||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ

स्वामीच या पंचप्राणामृतात ||

हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |

न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||

अशक्य ही शक्य करतील स्वामी || ५ ||

संदर्भ आणि नोंदी