Jump to content

"सदाशिव काशीनाथ छत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे (जन्म : वाळकेश्वर-मुंबई, इ.स. १७८८; म...
(काही फरक नाही)

२२:३०, ३१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे (जन्म : वाळकेश्वर-मुंबई, इ.स. १७८८; मृत्यू : इ.स. १८३०) हे इंग्रजी व संस्कृत गद्य पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे एक लेखक होते. ते कवीही होते, पण त्यांच्या कविता उपलब्ध नाहीत.

मुंबई इलाख्यांत प्रथमतः शाळा स्थापन करणें हे काम इंग्रज सरकारकडून सुरू करताना कर्नल कौपर व जॉर्ज .जार्व्हिस या अधिकार्‍यांनी यांनी बापू छत्र्यांची मदत घेतली होती.

बापू छत्रे हे देशी भाषांमधून पुस्तके करवून घेणार्‍या हैंद शाळापुस्तक मंडळी या संस्थेचे डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी होते. त्यांनी जॉर्ज जार्व्हिस यांच्या मदतीने अनेक मराठी पुस्तके लिहिली. ही पुस्तके बहुतेक भाषांतरित आणि बालवाङ्‌मयात मोडणारी होती.

छत्र्यांनी जी पुस्तके इंग्रजीतून मराठीत आणली त्यांंपैकी बाळमित्र, इसापनीती, आणि वेताळपंविशी ही मुख्य होत.

बाळमित्र

सदाशिव काशीनाथ छत्र्यांचे ‘बाळमित्र’ हे पुस्तक इ.स. १८२८मध्ये प्रकाशित झाले. बर्क्विन या फ्रेंच लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या ‘चिल्ड्रेन्स फ्रेन्ड’ या इंग्रजी अनुवादावरून छत्र्यांनी हे ‘बाळमित्र’ मराठीत आणले. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले होते.


(अपूर्ण)