सदाशिव काशीनाथ छत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे (इ.स. १७८८:वाळकेश्वर, मुंबई, महाराष्ट्र - इ.स. १८३०) हे इंग्रजी व संस्कृत गद्य पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे एक लेखक होते. ते कवीही होते, पण त्यांच्या कविता उपलब्ध नाहीत.

मुंबई इलाख्यांत प्रथमतः शाळा स्थापन करणें हे काम इंग्रज सरकारकडून सुरू करताना कर्नल कौपर व जॉर्ज जार्व्हिस या अधिकार्‍यांनी यांनी छत्र्यांची मदत घेतली होती.

छत्रे हे देशी भाषांमधून पुस्तके करवून घेणार्‍या मुंबईच्या हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी (स्थापना - १८२२) या संस्थेचे डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी होते. त्यांनी जॉर्ज जार्व्हिस यांच्या मदतीने अनेक मराठी पुस्तके लिहिली. ही पुस्तके बहुतेक भाषांतरित आणि बालवाङ्‌मयात मोडणारी होती.

छत्र्यांनी बाळमित्र, इसापनीती, आणि वेताळपंचविशी[ संदर्भ हवा ] ही पुस्तके इंग्रजीतून मराठीत रुपांतरित केली.

बाळमित्र[संपादन]

सदाशिव काशीनाथ छत्र्यांचे बाळमित्र हे पुस्तक इ.स. १८२८मध्ये प्रकाशित झाले. बर्क्विन या फ्रेंच लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या चिल्ड्रन्स फ्रेन्ड या इंग्रजी अनुवादावरून छत्र्यांनी हे पुस्तक मराठीत आणले. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले होते.