Jump to content

"सुरेश भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुरेश भागवत हे मराठी नाटकांत आणि हिदी-मराठी चित्रपटांत आणि दूरच...
(काही फरक नाही)

००:१८, २४ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सुरेश भागवत हे मराठी नाटकांत आणि हिदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणारे महाराष्ट्रीय अभिनेते आहेत. ते मौज प्रकाशन संस्थेचे भागवत बंधू अर्थात वि.पु आणि श्री.पु. भागवत यांचे सख्खे पुतणे होत.

भागवत कुटुंबीय मूळचे कोकणातील देवरुख गावचे असल्याने सुरेश भागवत यांचे शालेय शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. ‘रचना संसद’ महाविद्यालयातून त्यांनी ‘आर्किटेक्चर’ची पदवी संपादन केली. शाळेत असताना त्यांनी स्नेह संमेलनात झालेल्या नाटकात काम केले होते. पण पुढे नाटकच करायचे असे तेव्हा त्यांच्या डोक्यात नव्हते. पुढील आयुष्यात ते योगायोगाने नाटकाकडे ओढले गेले.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतले यश

‘रचना संसद’ महाविद्यालयात असताना सुरेश भागवत एकदा ग्रंथालयात पुस्तक बदलायला गेले होतो. भवन्स कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी तेथे ‘ऑडिशन’ सुरू होती. ‘पुलं’चे भाऊ आणि अभिनेते-दिग्दर्शक रमाकांत देशपांडे ऑडिशन घेत होते. सुरेशना पाहिल्यावर त्यांनी त्याचीही रीतसर ऑडिशन घेतली आणि एकांकिकेतल्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. त्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुरेश भागवत यांनी गंगाधर गाडगीळ लिखित ‘बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती’ या एकांकिकेतली ‘बंडू’ ही मुख्य भूमिका केली आणि ‘उत्कृष्ट अभिनेता’ असे पारितोषिक मिळवले. त्याच वेळी आपण ‘नाटक’ करायचे हे सुरेश भागवतांनी नक्की केले.