"चऱ्होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: चर्होली हे पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्र... |
(काही फरक नाही)
|
०१:००, १५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
चर्होली हे पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात असून, इसवी सनाच्या बाराव्या शतकाचा आधीपासून अस्तित्वात असलेले एक गाव आहे.
या गावाचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे देऊळ देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल्याचे समजते. स्वकाम सेवा मंडळ नावाच्या संस्थेकडून मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे.
चर्होली गाव इ.स. १९९६ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. पूर्वी ह्या गावाला संपूर्ण तटबंदी होती, आता फक्त एक दगडी कमान शिल्लक आहे.
वाघेश्वर मंदिराच्या परिसरातच शिवसृष्टी साकारली जात आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा १६ फुटी अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे.
चर्होली गावाच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी चंद्राकार वाहत येते. गावाच्या आजूबाजूला टेकड्या आहेत. गावाच्या आसपास भाजीपाला, फळे यांची शेती आहे. गावातील मंदिरे लक्षवेधी नक्षीकाम असलेली आहेत.
निवृत्तिनाथी ज्ञानेश्वर भावंडांचा सहवास कधीकाळी या गावाला लाभला आहे. शिवाजीचे सरदार दाभाडे सरकार आणि देशमुख (तापकीर) सरकार हे या गावचे रहिवासी आहेत.
गावात वाघेश्वर विद्यालय नावाची शाळा असून डी.वाय.पाटील शिक्षणसंस्थेसारखेच एक विद्यासंकुल आहे.