"वीणा सानेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. वीणा सानेकर या मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी झटण... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. वीणा सानेकर या मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी झटणार्या एक मराठी लेखिका आहेत. |
प्रा. डॉ. वीणा सानेकर या मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी झटणार्या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी अभ्यास केंद्राअंतर्गत असलेल्या 'मराठी विद्याजगत' या गटाच्या प्रमुख आहेत. |
||
८ डिसेंबर २०१० रोजी मराठी अभ्यास केंद्र, ग्राममंगल, शिक्षण हक्क समन्वय समिती, समर्थ भारत व्यासपीठ आणि मराठी एकजूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'लढा मराठी शाळांचा' ही महाराष्ट्र-राज्यव्यापी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने प्रा. वीणा सानेकर यांची ' लढा मराठी शाळांचा ' ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली. ह्या पुस्तिकेबाबत आणि एकूणच मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल तसेच समाजाच्या बदलत्या मानसिकतेतही मराठी शाळांच्या गरजेबद्दल प्रा. वीणा सानेकर यांनी भारतीय दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ३ मे २०११ रोजी झालेल्या मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली होती. |
|||
मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’[[मानकरकाका]]’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत. |
मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’[[मानकरकाका]]’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत. |
१७:३२, ९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
प्रा. डॉ. वीणा सानेकर या मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी झटणार्या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी अभ्यास केंद्राअंतर्गत असलेल्या 'मराठी विद्याजगत' या गटाच्या प्रमुख आहेत.
८ डिसेंबर २०१० रोजी मराठी अभ्यास केंद्र, ग्राममंगल, शिक्षण हक्क समन्वय समिती, समर्थ भारत व्यासपीठ आणि मराठी एकजूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'लढा मराठी शाळांचा' ही महाराष्ट्र-राज्यव्यापी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने प्रा. वीणा सानेकर यांची ' लढा मराठी शाळांचा ' ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली. ह्या पुस्तिकेबाबत आणि एकूणच मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल तसेच समाजाच्या बदलत्या मानसिकतेतही मराठी शाळांच्या गरजेबद्दल प्रा. वीणा सानेकर यांनी भारतीय दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ३ मे २०११ रोजी झालेल्या मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली होती.
मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’मानकरकाका’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत.
वीणा सानेकर याम्ची पुस्तके
- आरसपानी जगताना (ललित)
- गट्टी कवितेशी (बालवाङ्मय)
- मानकरकाका (संपादन)
- लढा मराठी शाळांचा