"पी. साईनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पी. साईनाथ (पालगुमी साईनाथ, जन्म : मद्रास, इ.स. १९५७) हे भारत देशातील...
खूणपताका: असभ्यता ?
(काही फरक नाही)

१८:१७, ३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

पी. साईनाथ (पालगुमी साईनाथ, जन्म : मद्रास, इ.स. १९५७) हे भारत देशातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर सातत्याने लेखन करणारेे पत्रकार आहेत.

‘द हिंदूू’ ह्या इंग्रजी वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना आजवर अनेका आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

पी. साईनाथ यांनी पारी (पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडिया) या नावाच्या एका कार्यक्रमाची स्थापना केली आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांचे ते नातू आहेत.

शिक्षण

  • लयोला कॉलेज (मद्रास)
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

अध्यापन

सोफाया पॉलिटेक्निकच्या वृत्तपत्र विद्याशाखेचे व मद्रासमधील एशियन कॉलेज ऑफ जर्नॅलिझमचे ते अतिथी प्राध्यापक आहेत.

वृत्तपत्रकारिता

  • युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (वृत्तसंस्था)
  • बिट्झ (मुंबईचे वृत्तपत्र)
  • द हिंदू (चेन्नाई)

पी. साईनाथ यांनी लिहिलेली पुस्तके

  • Everybody Loves a Good Drought : Stories from India's Poorest Districts

पी. साईनाथ यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान

  • अल्बर्टा विद्यापीठाची डी.लिट.
  • इंडियन एक्सप्रेस (दिल्ली), दि न्यू इंडियन एक्सप्रेस (दक्षिणी भारत), दि स्टेट्समन (कलकत्ता) या वृत्तपत्रांकडून पुरस्कार आणि दि टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई)ची फेलोशिप.
  • ग्रामीण पत्रकारितेबद्दल ‘द स्टेट्समन’ पुरस्कार
  • पीयूसीएल (People's Union for Civil Liberties) ह्यूमन राइट्स जरनॅलिझम अवॉर्ड
  • प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार
  • युरोपियन संघाचा पुरस्कार (हा पुरस्कार पटकाविणारे ते पहिले भारतीय पत्रकार आहेत.)
  • रॅमन मॅगससे अवॉर्ड
  • राजा-लक्षमी अवॉर्ड
  • रामनाथ गोयंका पुरस्कार
  • लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार