Jump to content

"श्रीराम गोजमगुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २७: ओळ २७:
* राजा शिवछत्रपती
* राजा शिवछत्रपती
* सुळावरची पोळी
* सुळावरची पोळी

==श्रीराम गोजमगुंडे यांची भूमिका असलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका==
* तिसरा डोळा
* बंदिनी
* १००


==श्रीराम गोजमगुंडे यांची निर्मिती असलेले मराठी चित्रपट==
==श्रीराम गोजमगुंडे यांची निर्मिती असलेले मराठी चित्रपट==

२२:२४, ८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

श्रीराम गोजमगुंडे (जन्म : लातूर, २५ ऑगस्ट, इ.स. १९४५);मृत्यू : मुंबई, १ डिसेंबर, इ.स. २०१६) हे एक मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट निर्माते होते. कलाक्षेत्रात श्रीराम गोजमगुंडे यांनी लातूरचे नाव सर्वदूर पोहचविले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी गणेशमंडळामध्ये नाटिका सादर केली. ‌ही नाटिका पाहून त्यावेळचे दयानंद कॉलेजचे प्राचार्य के.एच. पुरोहित यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी गोजमगुंडे यांच्यावर टाकली.

श्रीराम गोजमगुंडे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या शिबिरात नाट्य प्रशिक्षणाचे धडे घेतले. राज्य नाट्य स्पर्धेतच त्यांच्यातील कलागुण दिसू लागले होते. ‘रसबहार’ नावाची नाट्यसंस्था काढून कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत ‘पुन्हा पुन्हा मोहन जोदाडे’, ‘फास’, ‘निष्पर्ण’ ही तीन नाटेके सादर करून त्यांनी प्रथम पुरस्काराची हॅटट्र‌िक नोंदविली होती.

पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात गोजमगुंडे यांच्या ‘बंदीशाळा’ या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत बक्षीसे मिळवली. या नाटकामुळेच त्यांना आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला होता.

अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही गोजमगुंडे यांचे नाव होऊ लागले होते. अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे प्रथम पुरस्कार तीनदा मिळविणारे ते पहिले कलावंत ठरले. किशोर मिसकीन यांनी १९७४ मध्ये राजा शिवछत्रपती यांच्यावर चित्रपट काढला. त्या चित्रपटात राजा छत्रपती यांची भूमिका करून गोजमगुंडे यांनी अभिनय क्षेत्रात आपले नाव कमाविले. ‘झाकोळ’, ‘अंजान भारत’, ‘आपलेच दात, आपलेच ओठ’, ‘सुळावरची पोळी’, ‘पारद’ आदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. श्रीराम लागू, राज दत्त यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनूभव घेतला. १९८०च्या दशकात ‘झटपट करू दे खटपट’ हा चित्रपट त्यांनी काढला. हा चित्रपट राज्यभरात गाजला होता. मराठवाड्यात तयार होणारी ही पहिलीच चित्रपट निर्मिती म्हणावी लागेल. विधानभवनात या चित्रपटाचा एक वादग्रस्त विषय चर्चेला आला. या चित्रपटाच्या पोस्टरच्या विरोधात औरंगाबादमध्ये एका चित्रपटगृहावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळचे तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख यांनी गोजमगुंडे यांची बाजू घेऊन त्या चित्रपटावरील संकट दूर केले होते. ‘निखारे’ हा त्यांचा चित्रपटही रसिकांना भावला. राम कदम यांच्या ‘गड जेजुरी जेजुरी’, ‘पिंजरा प्रीतिचा’, या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

मुंबईत राहणे त्यांना परवडे ना, म्हणून म्हणून लातूरमध्ये येऊन श्रीराम गोजमगुंडे यांनी चित्रपट निर्मिती व नाट्य निर्मिती केली. ‘शेवंता जीती हाय’ हे नाटक त्यांनी अजरामर केले. दूरदर्शनवर बंदिनी, तिसरा डोळा, १०० या सारख्या मालिकांतही त्यांनी भूमिका केली. नव्या कलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम श्रीराम गोजमगुंडे यांनी केले. २००५ पर्यंत त्यांनी स्वतःच दिग्दर्शन, लेखन व निर्मिती त्यांनी तब्बल दहा चित्रपट तयार केले.

श्रीराम गोजमगुंडे यांनी दिग्दर्शन करून नाट्य स्पर्धांत सादर केलेली मराठी नाटके

  • निष्पर्ण
  • पुन्हा पुन्हा मोहन जोदाडे
  • फास
  • बंदीशाळा

श्रीराम गोजमगुंडे यांनी दिग्दर्शित करून सादर केलेली व्यावसायिक नाटके

  • शेवंता जीती हाय

श्रीराम गोजमगुंडे यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट

  • अंजान भारत
  • आपलेच दात, आपलेच ओठ
  • गड जेजुरी जेजुरी
  • झाकोळ
  • पारद
  • पिंजरा पिरतिचा
  • राजा शिवछत्रपती
  • सुळावरची पोळी

श्रीराम गोजमगुंडे यांची भूमिका असलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका

  • तिसरा डोळा
  • बंदिनी
  • १००

श्रीराम गोजमगुंडे यांची निर्मिती असलेले मराठी चित्रपट

  • झटपट करू दे खटपट
  • निखारे